दिव्यांगांनी साकारल्या आकर्षक पणती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
’उडान’ उपक्रमात सहभागी व्हा; हर्षाली पाटील यांचे आवाहन
 
जळगाव, 3 नोव्हेेंबर - शहरातील रूशील फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग आणि गतीमंद बालकांनी दिवाळीनिमित्त आकर्षक पणती, मेणबत्त्या, चॉकलेट तयार केले आहे.
 
आकर्षक वस्तू विक्रीसाठी शहरात स्टॉल थाटण्यात आले असून दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्यासाठी जळगावकरांनी खरेदीरूपाने हातभार लावण्याचे आवाहन संचालिका हर्षाली चौधरी यांनी केले आहे.
 
 
रूशील फाऊंडेशनतर्फे गेल्या दोन वर्षापासून उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्रात 47 विद्यार्थी असून त्यापैकी 10 अंथरूणावर, 17 दिव्यांग तर उर्वरित गतीमंद आहेत.
 
दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी दर महिन्याला नवीन वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येत असल्याची माहिती हर्षाली चौधरी यांनी दिली.
लक्ष वेधणार्‍या आकर्षक वस्तूंची निर्मिती
 
दिव्यांग, गतीमंद बालकांनी प्रशिक्षण केंद्रामध्ये दिवाळीनिमित्त आकर्षक रंगीबेरंगी पणत्या, मेणबत्त्या, सुगंधी अगरबती तयार केल्या आहे. इतकंच नव्हे तर ड्रायफू्रट, ओरीओ, वॉलनट फज, कॉफी, रोझ, व्हाईट अशी 12 प्रकारची चॉकलेट, ड्रायफ्रूट चिक्की, जेली स्वीटस् आणि ड्रायफ्रूट बॉक्सेस तयार केले आहे. सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी देखील ठेवण्यात आल्या आहेत.
 
तीन ठिकाणी होणार विक्री
 
दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, नवीन पोस्टल कॉलनी, मू.जे.महाविद्यालयामागे, शिरसाळे लाँड्रीजवळ आणि भाऊंच्या उद्यानासमोर तसेच एबीएस जीमच्या बाहेर खान्देश मॉल आवारात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तूंची विक्री केली जाणार आहे. जळगावकरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना उभारी देण्यासाठी अधिकाअधिक हातभार लावावा असे आवाहन हर्षाली चौधरी यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@