खासगी शाळा शिक्षक संघटना तालुका कार्याध्यक्षपदी गणेश बिचवे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |

 
पारोळा, 3 नोव्हेंबर - येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयात जळगाव जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटना संघाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
 
अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष शरद सुर्वे होते. व्यासपीठावर अशोक पाटील, विभागीय सचिव आर. डी.बोरसे उपस्थित होते. कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
 
तालुका संघटना अध्यक्षपदी गोरख प्रताप सूर्यवंशी कार्याध्यक्षपदी प्रदीप रघुनाथ बिचवे, सचिव विनोद हिलाल पाटील,उपाध्यक्ष विजय भबुत पाटील, अशोक पाटील, संचालक भूषण युराज शिरसाठ, आस्तिक पाटील, ललित चाटे, संजय पाटील, सुनील साळुंखे, उमाकांत काशीनाथ बाविस्कर, किरण परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
यावेळी शिरीष बागुल, योगेश बोरसे , किशोर पाटील, निलेश पाटील, रवी पाटील, देविदास पाटील, विनोद पाटील उपस्तीत होते. सूत्रसंचालन विनोद पाटील तर आभार योगेश बोरसे यांनी मानलेत.
@@AUTHORINFO_V1@@