आजपासून भाजपा जिल्हा महानगर पं.दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
 
जळगाव, 3 नोव्हेेंबर - भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने रविवार, 4 रोजी सकाळी 09 वाजेपासून जळगाव महानगर विधानसभा क्षेत्रासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ब्राह्मण सभा मंगल कार्यालय जळगाव येथे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे(राजुमामा) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.
 
पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्गासाठी विशेष आमंत्रित मा.खा.ए.टी.नाना पाटील, मा.आ.सौ.स्मिताताई वाघ, मा.आ.चंदूभाई पटेल, मा.सौ.अस्मिताताई पाटील, मा.महापौर सौ.सीमाताई भोळे, मा.उपमहापौर अश्विनभाऊ सोनवणे हे राहणार असून बैठकीस अपेक्षित जिल्हा पदाधिकारी, सभागृहनेते, गटनेते, उपगटनेते, नगरसेवक, जिल्हा मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, जिल्हा आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, व बूथ प्रमुख यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पदाधिकारी संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, मनपा राजेंद्र घुगे, मनोज भांडारकर यांच्या तर्फे करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@