गुजराथी समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
महिलांकडून नाटिका तर लहान मुलामुलींचे नृत्य, गायनाचे सादरीकरण
 
 
जळगाव, 3 नोव्हेेंबर - श्री गुजराती समाज मित्र मंडळातर्फे इयत्ता 10 वी, 12 वी आणि पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर समाजाचे अध्यक्ष राजेश दोशी, सेक्रेटरी राजेंद्र पिपरीया, नवरात्रीचे प्रोजेक्ट चेअरमन सतीष साड, व्हा.प्रोजे.चेअरमन शैनक जानी, मुकेश चव्हाण, कार्याध्यक्ष अश्विन सुरतवाला, सह.कोषाध्यक्ष तुषार दोशी उपस्थित होते.
 
 
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. तसेच समाजातील अल्प वयात सीए पदवी प्राप्त, बी.ए.एम.एस.डॉक्टरची पदवी प्राप्त विद्यार्थिनीचाही विशेष सत्कार करण्यात आला.
 
 
या प्रसंगी समाजाच्या महिला मंडळ यांनी नाटीका आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच लहान मुलामुलींची नृत्य व गायनचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन सेके्रटरी राजेंद्र पिपरीया, विपुल सेठ यांनी केले. आभार राजेश दोशी यांनी मानले.
 
यशस्वितेसाठी हितेश शाह, भरत छत्रीवाला, अशोक रावळ, नैलेश पारेख, राजू जानी, रितेश भाटीया, चेतन वेद, कमलेश वेद, पियुष रावळ, जय दोशी आदीं समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@