विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवाळी उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
 
 
जळगावं, 3 नोव्हेंबर - विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज दिनांक 3 नोव्हेंबर 2018 शनिवार रोजी पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागात आनंदाची पर्वणी घेऊन येणारा दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यादिवशीचे आकर्षण म्हणजे शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकाश कंदिलांनी सजविण्यात आलेला होता. व्यासपीठावर दिवाळी सणाच्या दृष्टीने वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज यांची आरास मांडण्यात आलेली होती.
 
 
आजच्या दिपोत्सव या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिक विभागाचे समन्वयक श्री. गणेश लोखंडे, प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सौ. रत्नमाला पाटील, पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सौ. सविता कुलकर्णी हे उपस्थित होते.
 
या कार्यक्रमाची सुरुवात दिवाळी येणार अंगण सजणार आनंद येणार घरोघरी या गाण्याने करण्यात आली. त्यानंतर गोवत्स, धनवंतरी, लक्ष्मी यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले व शाळेतील शिक्षिकांनी धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या पाचही दिवसांची माहिती सांगितली.
 
 
 
प्राथमिक विभाग :-
 
याच पध्दतीने प्राथमिक विभागातही प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर पाटील व समन्वयिका सौ. रत्नमाला पाटील यांच्या हस्ते पूजन करुन दिवाळी साजरी करण्यात आली व विद्यार्थ्यांना दिवाळी सणाबद्दल माहिती देण्यात आली. प्राथमिक विभागातील कार्यक्रमाप्रसंगी अपर्णा साळुंखे यांनी सुत्रसंचलन केले व कार्यक्रम प्रमुख सौ. किर्ती नाईक यांनी आभार मानले.
दिवाळीच्या पाच
 
 
दिवसांचे वर्णन :-
 
धनत्रयोदशी :- दिवाळीच्या पाच दिवसांची सुरुवात हि धनत्रयोदशी ने होते या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात. घर दिव्यांनी सजवतात. धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो.
 
असे म्हटले जाते कि यादिवशी देवी धन्वंतरी चा जन्म दिवस पण असतो. देवीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना केली जाते. बरेचस्या लोकांचे मानणे आहे कि याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते. सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते.
 
 
नरकचतुर्दर्शी ः-
 
हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी लोक घर रंगांनी सजवतात महिला हातांवर मेहंदी काढतात. दिवाळीची संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातो. लहान मुलांना उपहार दिले जातात.
 
 
दिवाली - लक्ष्मीपूजन :-
 
पाच दिवसांच्या दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस ज्याला आपण दिवाळी असे हि म्हणतो. या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरीती रिवाजात माता लक्ष्मी श्री गणेश भगवान आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते व देविदेवताना आमंत्रित केले जाते.
 
घरात नेहमीसाठी वास करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दरवाजे खिडक्या खुले ठेवले जातात. तेथे सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते.
 
पूजा रीतिरिवाजाने पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनांच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणीत केले जाते. गोड पदार्थ खावू घातले जातात. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभकामना दिल्या जातात या दिवशी व्यापारी व व्यावसायिक आपल्या दुकांनांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.
 
 
पाडवा ः-
 
दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो या दिवशी विवाहित दाम्पत्ती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन पूजा करतात. ग्रामीण भागात घरातील पशूंना विशेषतः गाई बैल आणि म्हशी व बकरयाणा सजवून त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न खायला देतात.
 
 
भाऊबीज ः-
 
दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊ-बहिणीच्या अतूट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावाला दिव्यांच्या आरास आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी व भरभराटीची शुभकामना करतात.
 
भाऊ बहिणीला छानसे उपहार देवून खुश करतात. व आपल्या नात्याला अधिक मधुर बनवण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस रक्षाबंधनाइतकाच पवित्र मानला जातो.
 
 
यावेळी शाळेतील विद्यार्थी असलेल्या बहिणींनी आपल्या भावांचे पूजन करुन भाऊबीज हा सण साजरा केला तसेच शुभदा नेवे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याबद्दल आवाहन केले व पर्यावरण पूरक दिवाळी संदर्भात माहिती सांगितली.
 
तसेच कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी संदर्भात मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. अनुराधा धायबर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
@@AUTHORINFO_V1@@