डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात दीपोत्सव उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |

 
 
जळगाव, 3 नोव्हेंबर - शनिवार दि. 3 नोव्हेंबर रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातील,पूर्व प्राथमिक विभागात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . ,त्यावेळी कार्यक्रमानुसार परिसर सुशोभित करण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी फटाके न फोडण्याचा संकल्प केला.
 
 
दीपोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. कल्पना बावस्कर , सौ. रोहीणी कुलकर्णी यांच्या हस्ते धन्वंतरी व लक्ष्मी मातेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात दिवाळीच्या पाचही दिवसाचे महत्व व शास्त्रीय कारणे सांगितली.
 
 
आरोग्यासाठी जशी शरीराची स्वच्छता आवश्यक असते त्याचप्रमाणे परिसर , घर , याठिकाणी सुद्धा स्वच्छता आवश्यक असते हे स्पष्ट करून ,मुलांना फटाके फोडल्याने होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. ’फटाके फोडू नयेत ’ असा संदेश देऊन त्याऐवजी गरीब मुलांना आपल्याजवळील काही चांगल्या वस्तू , कपडे व फराळाचे पदार्थ द्यावेत जेणे करून त्यांना ही दिवाळीचा आनंद मिळेल असे विशेषत्वाने सांगण्यात आले.
 
नंतर ’ दिवाळी येणार अंगण सजणार ’ हे गीत सादर करून मुलांना दिवाळीचा फराळ खाऊ म्हणून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.
@@AUTHORINFO_V1@@