भुसावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
परीक्षा शुल्क माफीसाठी युवासेना आक्रमक
 
 
भुसावळ, 3 नोव्हेंबर- तालुका दुष्काळी जाहीर झाला असून दुष्काळग्रस्त गावांमधील दहावी, बारावी तसेच पदवी व पदव्युत्तरपर्यंतच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार्‍या, सर्वच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी युवा सेनेने केली. यासंदर्भात प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले.
 
 
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शासनाने परिक्षा शुल्क माफीची घोषणा केली असली तरी अद्याप परिपत्रक प्राप्त झालेले नाही. शालेय विद्यार्थ्यांनी यापुर्वीच परीक्षा फि शाळांकडे जमा केली आहे.
 
त्यामुळे त्यांचे शुल्क परत करण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे तालुका अध्यक्ष हेमंत बर्‍हाटे, सूरज पाटील यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकार्‍यांकडे केली.
 
 
निवेदन देतांना इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी विधी देवकर, भाग्यश्री भोळे तसेच शिवसेना शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, नीलेश महाजन, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, मृगेन कुलकर्णी, गौरव पवार, अंशूल भाकरे, बबलू धनगर, सुरेंद्र सोनवणे, रोहीत महाले, प्रथमेश महाजन, हरीष गावंडे, मनीष जैन, अक्षय ठाकूर, विक्की चव्हाण, भूषण सोनार उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@