मलेशियात अडकलेल्या भिवंडीतील तरुणाची मुक्तता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |



भिवंडी: एजंटने फसवणूक करून नोकरीसाठी मलेशियात पाठविलेल्या भिवंडीतील तरुणाची रविवारी मुक्तता करण्यात आली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी खा. कपिल पाटील यांनी संपर्क साधल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने पावले टाकून मलेशियातील तरुणाची सुटका केली. जावेद मन्सूरी हे भिवंडीत टेलर काम करीत होते. त्यांना एका एजंटने मलेशियात बड्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तिकीट व व्हिसाकरिता एक लाख, ७५ हजार रुपये घेतले. जावेद याला मुंबईतील विमानतळाऐवजी ओडिसातील भुवनेश्वर विमानतळावर बोलाविण्यात आले.

 

विमानतळापासून काही अंतरावर जावेदचे मोबाईलवर शुटिंग घेण्यात आले. त्यात मी स्वत:च्या मर्जीने जात असल्याचे वदवून घेतले. जावेद मलेशियात पोहोचल्यावर, एजंटने पासपोर्ट व व्हिसाची कागदपत्रे ताब्यात घेतली. मात्र, स्थानिक पोलिसांनी जावेद काम करत असलेल्या ठिकाणी छापा टाकला, मात्र, जावेदकडे कागदपत्रे नसल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याने अनेकवेळा संबंधित एजंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला.

 

दरम्यान न्यायालयाने जावेदला दोषी ठरविले. तुरुंगात असतानाच त्याने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि सर्व हकीकत सांगितली. त्यांच्या कुटुंबीयांनी भाजपचे पदाधिकारी नजीर मन्सूरी यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने खा. पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून जावेदची तातडीने सुटका करण्यात आली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@