दुधाळ जनावरे, पक्षी संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
 
जळगाव, 3 नोव्हेंबर - राज्यात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत सन 2018-2019 या वर्षासाठी दुधाळ संकरीत गायी, म्हशींचे वाटप करणे, अंशत: ठाणबध्द पध्दतीने संगोपन करण्यासाठी शेळया, बोकड, मेंढ्या, नर मेंढा पुरविणे व मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी पशुसंवर्धन विभगामार्फत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणेत येत आहेत. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी दिली आहे.
 
 
या योजने अंतर्गत (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेतंर्गत ) या प्रवर्गातील अर्जदांराकडून 15 ते 29 नोव्हेंबरदरम्या ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेची पूर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील (https://ah.mahabms.com) पशुसंवर्धन विभागाचे या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन भरणे बंधनकारक आहे.
 
निवड यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यांची कागदपत्रे वेबसाईडवर अपलोड करणे बंधनकारक आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी विहित मुदतीत खरेदीची कार्यवाही पूर्ण करुन आवश्यक कागदपत्र, छायाचित्र, विमा देयके पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेमार्फत पाठविणे गरजेचे आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगांव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
@@AUTHORINFO_V1@@