संकटात सापडलेल्या नागरिकाला नेहमी मदत करा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
धुळ्यात पोलीस प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत सोहळ्यात महानिरीक्षक अश्वती दोर्जे यांचे प्रतिपादन

 
 
धुळे, 3 नोव्हेंबर - पोलिसांचा दैनंदिन जीवनात सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क येतो. त्यामुळे संकटात सापडलेल्या नागरिकाला कायद्याच्या चौकटीत राहून सर्वतोपरी मदत करावी, असे प्रतिपादन नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या संचालक तथा विशेष पोलिस महानिरीक्षक अश्वती दोर्जे यांनी आज येथे केले.
 
 
पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथे महिला पोलिस प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक सातचे दीक्षांत संचलन आज झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी प्राचार्य शशिकांत महाजन यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
 
 
विशेष पोलिस महानिरीक्षक श्रीमती दोर्जे म्हणाल्या, पोलिस प्रशिक्षण केंद्रातील महिला मूलभूत व खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन नव्या जीवनात प्रवेश करीत असून त्यांच्यावर आता महत्वपूर्ण जबाबदारी येणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या पोलिस अधिकारी किरण बेदी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आदर्श निर्माण केला आहे.
 
 
दैनंदिन जीवनात वावरताना संकटातील नागरिकाला सहकार्य केल्यास समाजात तुमचा आदर्श निर्माण होईल. पोलिस प्रशिक्षण अकादमीत मिळालेले ज्ञान कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी उपयोगात येईल. जीवनात अभ्यासू वृत्ती कायम ठेवत कुटुंब व समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
प्राचार्य श्री. महाजन यांनी सांगितले, पोलिस प्रशिक्षण केंद्रात राज्याच्या निरनिराळ्या जिल्ह्यातून 471 महिला पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यात कायद्याचे मूलभूत ज्ञान, गुन्हे तपास व प्रतिबंध, पोलिस संघटन, कायदा व सुव्यवस्थेसह विविध विषयांचा समावेश होता.
 
 
यावेळी उत्कृष्ट आंतरवर्ग अधिकारी जयवंत देवराम पगारे, बाह्य वर्ग अधिकारी युवराज कौतिक पाटील, रामेश्वर श्यामसिंग सोळंके, कुणाल भारती, अनिल राजाराम महाले, जितेंद्र लोटन चंदेल, सुभाष धीरबस्सी, किरण खैरनार, मनोजकुमार वाणी, चंद्रकांत पाटील, प्रवीण खैरनार, गणेश ढामळे, सुरेश बहाळकर, रुपेश देशमुख, मेघा आखाडे, किशोर गोधडे आदींचाही सत्कार करण्यात आला.
 
बक्षीसपात्र प्रशिक्षणार्थींची नावे अशी
 
आंतरवर्ग प्रथम- हेमांगी दिनेश मराठे, बाह्यवर्ग प्रथम- शिवानी गजानन आठवले, सर्वोत्कृष्ट गोळीबार- मोनाली भरत लिंभोरे, कवायत- प्रीती प्रवीण बारिया, खेळाडू- सुरेखा विक्रम माळी, कमांडो- नंदिनी पुरुषोत्तम मते, उत्कृष्ट शिस्तबध्द प्रशिक्षणार्थी/टर्नआऊट- मनीषा सतीश शिंदे, कवायत- करिश्मा महेबूब मुल्ला, सर्वोत्कृष्ट द्वितीय- शीतल शिवाजी गोंधळे, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी- हेमांगी दिनेश मराठे.
@@AUTHORINFO_V1@@