एड्स नियंत्रण दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |

राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे 1 डिसेंबरपासून पंधरवडा

 
 
 
जळगाव : 
 
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था राज्यात जागतिक एड्स नियंत्रण सप्ताहास सुरुवात करीत आहे. यंदाचे सप्ताहाचे ‘नाऊ युव्हर स्टेट्स’ हे घोषवाक्य असून नागरिकांनी एचआयव्ही / एड्सविषयक जनजागृती करण्यासाठी 1 डिसेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान हा सप्ताह होत आहे.
 
पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.
 
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा शल्यचिकित्सक एन.सी.चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर आदी उपस्थित होते.
 
पोस्टर प्रदर्शन
 
2 व 3 डिसेंबर रोजी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग, सामान्य रुग्णालयाच्यावतीने नवीन बसस्थानक व रेल्वेस्थानक आवारात 5 डिसेंबर रोजी पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात येऊन एचआयव्ही / एड्सबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
 
संवेदीकरण व लघुपट
 
4 डिसेंबर रोजी अमळनेर येथे दुपारी 3 वा. विप्रो कंपनीमध्ये एचआयव्ही / एड्सबाबत जनजागृतीपूर्वक लघुपट व संवेदीकरणचे आयोजन करण्यात येणार आहे. 1 ते 15 डिसेंबरदरम्यान जिल्ह्यातील 38 महाविद्यालयांत स्थापित असलेल्या रेडरीबिन क्लबद्वारे युवकांमध्ये पोस्टर प्रदर्शन, व्याख्यान, चित्रफीत दाखवून जिल्ह्यातील 25 आयसीटीसी केंद्राद्वारे कार्यक्रम राबविण्यात येईल. तसेच जिल्हा कारागृह, जळगाव व भुसावळ येथे एचआयव्ही एड्सबाबत संवेदीकरण करण्यात येईल.
 
पोस्टर मेकिंग स्पर्धा
 
6 ते 11 डिसेंबरदरम्यान फाईन आर्ट महाविद्यालयाच्या वतीने पोस्टर मेकिंग स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येईल. ‘नाऊ युव्हर स्टेट्स’ या विषयावर पथनाट्य स्पर्धा 12 ते 20 डिसेंबरदरम्यान स्पर्धा होणार आहे.
पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य अन् प्रभात फेरी
 
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागातर्फे एचआयव्ही व जागतिक एड्स दिनानिमित्त प्रदर्शन, प्रभात फेरी, पथनाट्य होणार आहे. प्रभात फेरीचे उद्घाटन 1 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा.जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते होईल.
 
 
प्रभात फेरीमध्ये शहरातील माध्यमिक शाळेतील, महाविद्यालयीन विद्यार्थी, आयोग्य विभाग व शासनाच्या विविध कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था यांचा सहभाग असेल.
 
सुरुवातीस एड्स दिनानिमित्त शपथ देण्यात येऊन प्रभात फेरी जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून निघून बेंडाळे चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकमार्गे जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परत येईल. तसेच तालुकास्तरावरही चोपडा, अमळनेर, यावल, धरणगाव, पाचोरा येथेही ग्रामीण रुग्णालयातील आयसीटीसी केंद्रामार्फत प्रभात फेरी तसेच पोस्टर प्रदर्शन, व्याख्यान होणार आहे. एमआयडीसी येथे एचआयव्ही एड्सविषयक पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
रेड रीबिन क्लब
 
1 डिसेंबर रोजी सप्ताहानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत एनएसएस युनिट व रेड रीबिन क्लबतर्फे महाविद्यालयांत दिवाळी शिबिरामध्ये प्रत्येक गावामध्ये एचआयव्ही / एड्स जनजागृतीपर कार्यक्रम आयसीटीसी केंद्र यांच्यामार्फेत होणार आहे.
 
त्यामध्ये व्याख्यान, पोस्टर प्रदर्शनाचा समावेश असेल. तसेच 25 आयसीटीसी केंद्राद्वारे प्रत्येक महाविद्यालयात रेड रीबिन क्लबमार्फत युवकांकरिता व्याख्याने, संवेदीकरण व लघुपट दाखविण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@