अनोळखी इसमाच्या मृतदेहावर घटनास्थळी अंत्यविधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |

आसोदा रेल्वेगेटजवळील घटना, पोलीस-डॉक्टरांनी केला पंचनामा


जळगाव : 
 
शहरातील आसोदा रेल्वेगेटजवळ असलेल्या पुलाखालील नाल्याच्या पाईपात सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला.
 
दुर्गंधी सुटल्याने हा प्रकार लक्षात आला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांनी पंचनामा करून त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला.
 
दरम्यान, अग्निशमन विभागाच्या मदतीने सकाळी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पाईपाबाहेर काढण्यात आला. आसोदा रेल्वेगेटजवळ रस्त्याला लागून भरत चंपालाल दरटेकर रा. हरिओमनगर यांची पानटपरी आहे.
 
गुरुवारी सकाळी आसोदा रेल्वेगेट परिसरात दुर्गंधी सुटली. दरटेकर या तरुणाने याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे, पीएसआय खेमचंद परदेशी, एएसआय करीम शेख, गिरीश पाटील, अशोक पवार, प्रशांत देशमुख, अभिजीत सैंदाणे हे घटनास्थळी रवाना झाले. याठिकाणी शोधमोहीम राबविली असता रेल्वेगेटजवळ रस्त्याच्या खालून गेलेल्या नाल्याच्या पाईपामध्ये असल्याचे लक्षात आले.
 
परिसरात काही दिवसांपासून नग्न अवस्थेत फिरत असलेल्या वेडसर इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@