तरुणांकरिता पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |

10 डिसेंबरला उपस्थितीचे आवाहन

जळगाव : 
 
जळगाव जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याक समाजातील तरुणांकरिता पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे 10 डिसेंबर, 2018 रोजी आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी दिली आहे.
  
यापूर्वी भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम 3 डिसेंबर, 2018 रोजी निश्चित करण्यात आला होता. तथापि, जळगाव जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर, 2018 पर्यंत सैन्यभरती सुरू आहे. त्यामुळे सदरचे भरतीपूर्व प्रशिक्षण हे 5 डिसेंबर, 2018 नंतर घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
 
त्यानुसार आता मा. सचिव, महाराष्ट्र शासन, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील 28 नोव्हेंबर, 2018 नुसार अल्पसंख्याक समाजातील तरुणांकरिता पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सन 2018-19 अंतर्गत उमेदवारांची निवड करण्यासाठी 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे घेण्यात येणार आहे.
 
 
तरी या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांनी 10 डिसेंबर, रोजी नमूद केलेल्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे. या प्रशिक्षणाबाबत अर्ज तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
उमेदवारांनी निवडीसाठी येताना पुढील कागदपत्रे सोबत आणावी, असे जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
@@AUTHORINFO_V1@@