म्हाडाच्या खोणी येथील घरांना जीएसटी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |


मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१८ च्या सोडतीतील अत्यल्प उत्पन्न गटातील ठाणे,खोणी येथील ९८९ घरांच्या विजेत्यांना पलावा बिल्डरने डिमांड व टॅक्स इन्व्हाईस पत्र पाठवून वास्तू व सेवाकर ऑन कंसीडरेशन व्हॅल्यूव ६७ हजार २३३ रक्कम जमा करण्याचे पत्र पाठवल्याने विजेत्यांमध्ये म्हाडा विरुद्ध नाराजी पसरली असून बिल्डरने जीएसटी न लावण्याची मागणी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना पत्राद्वारे केली आहे.

 

कोकण मंडळाने १९ ऑगस्ट २०१८ रोजी काढलेल्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीतील ठाणे, कल्याण येथील मौजे खोणी हेदुटने येथील संकेत क्रमांक २५२ एकात्मिक/विशेष नगर वसाहत प्रकल्पाअंतर्गत सामाजिक गृहनिर्माण घटका अंतर्गत उभारलेल्या ९८९ घरांच्या अत्यल्प गटातील विजेत्यांना पलावा बिल्डरने पत्र पाठवून जीएसटी १६ हजार ८१४ तीस दिवसांच्या आता भरा आणि इतर रक्कमा जीएसटी ऑन कंसीडरेशन व्हयलूव ६७ हजार २३३ रक्कम ६० दिवसांच्या आता भरण्यास सांगितले आहे.

 

याबाबत काही विजेत्यांनी पलावा बिल्डर यांना विचारले असता त्यांनी सांगितले म्हाडानेच आम्हाला जीएसटी घेण्यास सांगितले आहे. पलावा बिल्डराला जीएसटी न आकरणाचे आदेश दयावेत अशी मागणी विजेत्यानी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना पत्राद्वारे केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@