जमीन घोटाळ्याप्रकरणी वढेरांना ईडीचा समन्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |


नवी दिल्ली : राजस्थानच्या बिकानेर शहरातील जमीन खरेदी घोटाळ्याचा तपास करणार्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना समन्स जारी केला आहेया समन्सनुसार वढेरा यांना पुढील आठवड्यात ईडीच्या मुख्यालयात हजर राहायचे आहे. बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांना या प्रकरणात बजावण्यात आलेला हा दुसरा समन्स आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला वढेरा यांना समन्स जारी करण्यात आला होता, पण ते हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना आता दुसरा समन्स बजावण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत आणि पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या या संवेदनशील भागात वढेरा यांच्या कंपनीला जमीन देण्यात आली होती. २०१५ मध्ये हा व्यवहार झाला होता. बिकानेरच्या तहसिलदाराने या व्यवहाराची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून वढेराविरुद्ध एनआयआर दाखल केला होता. याचाच आधार घेऊन ईडीने वढेराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

वढेरा यांनी स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. या कंपनीच्या नावावर हा संपूर्ण व्यवहार केला होता. या कंपनीचे नेमके कार्य काय आहे, हे ईडीला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे आणि यासाठीच त्यांना पुन्हा एकदा समन्स जारी करण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. ईडीने यापूर्वी याच प्रकरणात वढेराशी संलग्न असलेल्या काही कंपन्यांच्या कार्यालयाची कसून झडतीही घेतली आहे.

 

राहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो : नवज्योतसिंग सिद्दू

 

करतारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजनासाठी माझा पाकिस्तानचा दौरा व्यक्तिगत नव्हता, काँग्रेस चे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानेच मी पाकला गेलो होतो, असा खळबळजनक खुलासा काँग्रेसचे आमदार आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला. राहुल गांधी हेच माझे कर्णधार आहे आणि त्यांचा आदेश मला ऐकावाच लागतो. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मला पाकला जाण्यापासून रोखले होते, पण राहुल गांधी आणि पक्षातील सुमारे २० वरिष्ठ नेत्यांनी मला तिथे जाण्याचा आदेश दिला होता. यामुळे वडिलांसमान असलेल्या अमरिंदरसिंग यांचे मन दुखावून मला पाकला जावे लागले, असे सिद्धू यांनी सांगितले. सिद्धू यांचा पाक दौरा व्यक्तिगत होता, ते स्वत:हून तिथे गेले होते, असा दावा काँग्रेस नेते करीत असताना, सिद्धू यांनी या सर्व नेत्यांना उघडे पाडले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@