थंडीचा जोर वाढला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |
जळगाव : 
 
शहरात दोन - तीन दिवसापासून थंडीचा जोर वाढला आहे. सायंकाळी सहा वाजेपासूनच थंडी जोर धरू लागत आहे. या बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारही उद्भवू लागले आहे.
 
शहरातील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात डोकेदुखी, सर्दी, खोकला, सांधे आखडणे, अंगदुखी, सांधेदुखी, पायाच्या तळव्यांमध्ये वेदना अशा अनेक आजाराने रुग्ण दैनंदिन उपचार घेत आहेत.
 
दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार गरमच खाणे आवश्यक असून शिळे व थंड आहार टाळावेत. पाणीही कोमटसर गरम करून प्यावे. आहारात गायीचे तूप असावे.
 
आहार उष्ण व स्निग्ध असावा तसेच शरीरासदेखील बाहेरून तेलाचा अभ्यंग करावा. अभ्यंगासाठी तीळ, तेल वा अभ्यंग तेल कोमटसर गरम करून त्वचेवर जोखावे. तद्पश्चात उटणे वा ज्वारीचे पीठ लावून शरीर घासत गरम पाण्याने स्नान करावे.
 
पायाचे तळवे दुखत असल्यास गार फरशीवर चालण्यापूर्वी चप्पल घालावी. फार वेदना होत असल्यास चालण्याअगोदर पायाचे तळवे शेकावे वा गरम पाण्यात काही वेळ बुडवून ठेवावेत. बाहेर पडण्यापूर्वी स्कार्फ, कानटोपी वापरावी. थंड हवेचा डोक्याशी येणारा थेट संपर्क टाळावा.
@@AUTHORINFO_V1@@