लष्करप्रमुखांचा पाकवर हल्लाबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |



पुणे : भारतासोबत मैत्री करू पाहणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यावर भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी चांगलाच हल्लाबोल केला. “ मैत्रीची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने दहशतवादाविरोधात एक पाऊल पुढे टाकून दाखवावे. पाकिस्तान सकारात्मक पाऊल टाकत नाही, तोपर्यंत दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही” असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३५ दिक्षांत संचलन सोहळ्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 

पाकिस्तानने स्वतःला इस्लामिक देश केले आहे. भारतासोबत चर्चा हवी असल्यास पाकिस्तानला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल. तसे झाले तरच दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'मैत्रीत भारताने एक पाऊल पुढे टाकले तर मी दोन पावले पुढे टाकीन' असे वक्तव्य केले होते. त्यावर लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.

 

महिलांनाही मिळेल युद्धभूमीत समावेश

 

सद्यस्थिती पाहता लष्करात महिला कायमस्वरूपी अधिकारी पदावर घेण्यात येत नाही. अजूनही थेट युद्धभूमीत समावेश शक्य नाही. मात्र पुढील काळात महिलाना लष्करी कुटनीती, दुभाषी या सारख्या मोठ्या भूमिका बजावू शकतात या दृष्टीने विचार सुरू आहे. अशा प्रकारच्या संधी लवकरच महिला अधिकाऱ्यांना लष्करात दिल्या जातील. तसेच अजून लष्करात ग्रामीण भागातून येणाऱ्या जवानांची संख्या फार मोठी आहे. पुण्यामुंबईत राहणाऱ्या नागरिकांना सारखी मानसिकता नाही ही बदलणे गरजेचे.” असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@