नगराध्यक्षपदासाठी 4 तर नगरसेवकपदासाठी 49 उमेदवार रिंगणात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |
 
 
 
 
शेंदुर्णी : 
 
नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी 62 उमेदवारांपैकी 9 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 53 उमेदवार रिंगणात असून नगराध्यक्षपदासाठी 4 तर 17 नगरसेवकपदासाठी 49 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
 
 
निवडणुकीत भाजप, शिवसेना, मनसे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून मैदानात आहेत. माघारीमुळे निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झालेले असून बर्‍याच प्रभागांमध्ये चौरंगी, तिरंगी लढती पाहायला मिळत असून काही प्रभागांमध्ये सरळ लढती आहेत.
 
 
नाराजांना थोपविण्यात यश
 
एबी फॉर्म अर्जाला लागल्या नंतर एक दिवस मुदत वाढल्याने उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक नाराज उमेदवारांनी या मुदतीचा फायदा घेत अपक्ष अर्ज सादर केले होते.
 
29 च्या माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून शर्तीच्या प्रयत्नांनंतर नगराध्यक्षपदासाठी 2 अपक्ष तर नगरसेवकपदासाठीच्या 9 अपक्षांपैकी अपक्ष 6 आणि शिवसेनेचा 1 अशा एकूण सात उमेदवारांची माघारी घेण्यात यश आले आहे.
 
असे असले तरी अपक्ष उमेदवार प्रभाग 16 मधील पूनम नरेंद्र बारी, पाटील शंकर पंढरी, प्रभाग क्र .13 मध्ये शेख रियाज फयाज यांची माघारी घेण्यात यश आले नाही. त्यामुळे तीन अपक्ष उमेदवार रिंगणात राहणार आहे.
 
 
नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत
 
नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव असल्याने नगराध्यक्ष पदासाठीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून खलसे विजया अमृत (भाजपा ), गरूड क्षितिजा प्रवीण ( रा. काँ, काँग्रेस, आरपीआय ), बारी मनीषा विलास (शिवसेना), चौधरी सरिता प्रकाश (मनसे) उमेदवार रिंगणात असल्याने चौरंगी लढत होणार आहे, असे असले तरी मनसे आणि शिवसेना नव्या उमेदीने रिंगणात उतरले असल्याने खरी चुरशीची लढत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
17 प्रभागातील 17 जागांसाठी 49 उमेदवार
 
नव्याने तयार झालेल्या प्रभाग रचनेनुसार 17 प्रभागांतील 17 जागांसाठी 49 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपा 17 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आरपीआय आघाडी 17 उमेदवार, शिवसेना 8, मनसे 8 उमेदवार रिंगणात आहेत.
उद्यापासून रणधुमाळीला सुरुवात
 
राजकीय पक्षांनी चौकात जाहीर सभेची पूर्वतयारी केली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरींसह गाजण्याची शक्यता आहे. निवडणूक निरीक्षक भानुदास पालवेची भेट नगरपंचायत कार्यालयात भेट देऊन निवडणुकी संदर्भातील लेखाजोखा घेत निवडणूक पूर्वतयारीची माहिती घेतली व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात माहिती देत कायदा सुव्यवस्थेसह आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले.
 
तसेच निवडणूक निर्णायक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे जाहीर आवाहन केले. यावेळी तहसीलदार व प्रशासक नामदेव टिळेकर, मुख्याधिकारी राहुल पाटील उपस्थित होते.
प्रभाग/पक्षनिहाय उमेदवार असे
भाजपतर्फे हे उमेदवार
 
1. धुमाळ रंजना विजय, 2. गायकवाड ज्योती संजय, 3.पाटील गणेश किसन 4. बागवान नफिसाबी इलियास, 5. धनगर राहुल जगन्नाथ, 6. अग्रवाल चंदाबाई गोविंद, 7. ललवाणी सुशीलाबाई संदीप, 8. सैयद सुमयाबी मसूद, 9. बारी साधना शंकर, 10. बारी सतीश श्रीराम, 11. गुजर शाम अरूण, 12. थोरात निलेश उत्तम, 13. जोहरे गणेश वसंत, 14. सूर्यवंशी मोनाली पंकज, 15. तडवी अलीम बुर्‍हान, 16 बारी शरद बाबुराव, 17. बारी संगीता योगेश
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार
 
1 . अहिरे रेखा विलास, 2. निकम निर्मला विजय , 3. शाह नबी शुकर, 4. धनगर चंद्रभागा माधव, 5. धनगर श्रीराम काशिनाथ, 6. भावसार संगिता गोवर्धन, 7. जैन भावना धीरज, 8. खाटीक मोहसीना फारुख, 9. बारी सुनीता भास्कर, 10. बारी धनराज अर्जुन, 11. फासे प्रसन्न विठ्ठल, 12. गरूड प्रवीण रमेश, 13. गरुड अंबरिश काशीनाथ, 14. गुजर वृषाली योगेश, 15. तडवी नबी हबीब, 16. बारी नंदकिशोर किसन, 17. बारी कल्पना गजानन
शिवसेनेतर्फे हे उमेदवार
 
प्रभाग क्र .4 मांग मीराबाई आत्माराम, 8. भोई सुरेखा दिलीप, 9. बारी मनीषा विलास, 10. पाटील ज्ञानेश्वर नारायण, 11. सूर्यवंशी संजय देवीदास, 12. बारी विलास लक्ष्मण, 16 . बारी अशोक रघुनाथ, 17. माळी सिंधुबाई संतोष.
मनसेतर्फे हे उमेदवार
 
प्रभाग क्र. 1. कुलकर्णी भक्ती विजयानंद, 4. चौधरी सरिता प्रकाश, 5. सैयद अजगर अकबर, 7. कुलकर्णी भक्ती विजयानंद, 9. बारी उषा शरद, 12. कुलकर्णी विजयानंद अरूण, 13. कुलकर्णी विजयानंद अरूण, 14. बारी उषा शरद.
@@AUTHORINFO_V1@@