अपघातग्रस्तांसाठी बाळासाहेब ठाकरे योजना लागू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |

मुंबई : बाळासाहेब ठाकरे योजनेतर्गत अपघातग्रस्तांना तातडीने उपचारासाठी थेट रूग्णालयात ३० हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली. अपघाग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

 

योजनेची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सार्वजनिक सावंत यांनी सांगितले. दरम्यान, विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. राज्यातील कोणत्याही रस्त्यावर अपघात झाल्यास बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेंतर्गत ७२ तास मोफत औषधोपचार, तातडीने उपचार मिळावा,यासाठी ३० हजार रुपयांची मदत देण्यासाठी २०१५ साली ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र या योजनेचा मदत अद्याप मिळाली नाही. दरम्यान, ही मदत कधी मिळणार यासाठी ही लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती.

 

वर्षाला ५५ जण अपघातग्रस्त

 

राज्यात वर्षाला ५५ जण अपघातग्रस्त होतात.अपघातग्रस्तांना उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी महात्मा फुले, आयुष्यमान व बाळासाहेब ठाकरे या तीन योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतल्याचे सावंत म्हणाले. या योजनेतंर्गत अपघातग्रस्त किती जखमी ही बाब लक्षात घेत जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@