ट्रक कलंडल्याने 21 मजूर जखमी, 4 गंभीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |

तालुक्यातील वडलीजवळ अपघात : रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार

 
जळगाव : 
 
तालुक्यातील विटनेरहून कापूस भरुन पाचोर्‍याकडे जात असलेला ट्रक (एम.एच 20, डी.ई. 2526) वडलीजवळ वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने कलंडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घडली.
 
या अपघातात 21 मजूर जखमी झाले असून त्यापैकी 4 जण गंभीर आहेत. सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात गर्दी झालेली होती.
 
जिल्हा रुग्णालयात जखमी मजुरांकडून मिळालेली माहिती अशी की, कापसाचे व्यापारी बाळू वाघ रा.वरखेडी, ज्ञानेश्वर वाणी रा. सातगाव डोंगरी व भरत जैन रा. पाचोरा यांनी गुरुवारी सकाळी ट्रक भरण्यासाठी विटनेर गावात पाठविला होता.
 
 
ट्रक खाली करण्यासाठी ट्रक गुजरातकडे जाणार होता. तत्पूर्वी सर्व मजूर पाचोर्‍याला उतरणार होते. त्यानंतर ट्रक पुढे रवाना होणार होता. त्याआधीच ट्रक वावडद्यापासून 2 कि.मी. अंतरावर वडलीजवळ वळणावर वाहनचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने कलंडला.
 
यात ट्रकमधील मजूर 21 जखमी झाले. दरम्यान वाहनचालकाने मद्यप्राशन केले असल्याने ट्रक कलंडल्याचे जखमी दत्त मोकळे याने सांगितले.यात ट्रकमध्ये कापूस भरण्यासाठी गेलेले सर्व मजूर हे पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील आहेत.
 
यात भुरा तडवी (23), परवेश शेख (17), विकास श्यामराव पाटील (26), बंडू कोळी (24), पिंटू कोळी (22), दत्तू वाल्मीक मोकळे (22), संदीप गणपत कोळी (22), तात्याराव दगडू गवते (40), सुनील पुंडलिक डांबरे (30), समाधान महादू महाले (20), गोकुळ साहेबराव पोटे (22), रवींद्र वाल्मीक कोळी (23) जखमी तर विठ्ठल कोळी (30), गजानन भावडू जाधव(26), भैया संतोष गवळी (24) आणि मोईन गफूर शहा (30) हे गंभीर जखमी झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@