निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |
 
जळगाव, 2 नोव्हेंबर - निवृत्ती वेतन घेणार्‍या राज्य शासनाचे निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक तसेच इतर राज्याचे शासनामार्फत निवृत्ती वेतन घेणारे निवृत्ती वेतनधारक तसेच इतर राज्याचे निवृत्ती वेतनधारक जे जळगाव कोषागारातून निवृत्ती वेतन घेत असतील, त्यांनी दरवर्षी नोव्हेंबरात हयातीचा दाखला कोषागारात सादर करणे आवश्यक आहे.
 
 
राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना हयातीचा दाखला देण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने बोटाचे ठसे व आधार कार्ड लिंक करून जीवन प्रमाणपत्र पोर्टल, मोबाईलद्वारे करण्याची सुविधा जिल्हा कोषागार कार्यालय व तालुका उपकोषागार कार्यालय येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याचा सर्व निवृत्ती वेतनधारकांनी लाभ घ्यावा.
 
 
तसेच पूर्वीप्रमाणे बँकेमार्फत हयातीचे दाखले देण्याचीही कार्यवाही करावयाची आहे. तरी जीवन प्रमाणपत्र बायोमेट्रिक पद्धतीने जिल्हा कोषागार कार्यालय व तालुका उपकोषागार कार्यालय व नियमितपणे 1 नोव्हेंबर, 2018 पासून निवृत्ती वेतन आहरीत करताना बँकेत हयातीचे प्रमाणपत्र स्वाक्षरी करून सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सी. पंडित यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@