महिला सक्षमीकरणात प्रतिष्ठा महिला मंडळाचा सिंहाचा वाटा :खा. रक्षाताई खडसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |

 
 
भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळाच्या उद्योजक मेळाव्याचे उद्घाटन
भुसावळ,2 नोव्हेंबर - चूल आणि मुल या संकल्पनेपुरताच आता महिलांचे काम मर्यादित राहिलेले नाही तर महिला आता खर्‍या अर्थाने सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. भुसावळसह तालुक्यातील महिलांना रोजगार उपलब्धतेसोबत त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्यात प्रतिष्ठा महिला मंडळाचा वाटा सिंहाचा असून या मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांचे कार्य खरोखरच कौस्तुकास्पद असल्याची भावना खा. रक्षा खडसे यांनी येथे व्यक्त केली.शहरातील ब्राह्मण संघात प्रतिष्ठा महिला मंडळाच्या चारदिवसीय उद्योजक मेळाव्याचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
 
 
 
 
                                                          लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढली
खा. खडसे म्हणाल्या की, जे काम लोकप्रतिनिधींनी केले आहे, ते काम आता प्रतिष्ठा मंडळाने केले आहे. महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या वस्तू विक्रीसाठी मेळावा भरवणे ही संकल्पना अतिशय छान आहे. आजकाल हाताने बनवलेल्या वस्तूंचे मार्केट तेजीत आहे. महिला स्वबळावर दोन पैसे कमवत असल्याची बाब गौरवास्पद आहे. या माध्यमातून त्यांना पुढे जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात भुसावळात बहिणाबाई महोत्सव भरवण्यात येईल व या माध्यमातून किमान चारशे स्टॉल महिलांना उपलब्ध करू, असेही त्या म्हणाल्या. नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, नगरसेवक युवराज लोणारी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, नगरसेविका सोनल महाजन, मेघा वाणी, नगरसेवक किरण कोलते, रावेर पंचायत समिती सदस्य वानखेडे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिकेत पाटील, हिमांशू दुसाने आदी उपस्थित होते.
                                                 दुसर्‍याच्या आनंदात खरी दिवाळी : आ.सावकारे
कुठलेही मंडळ चालवण्यासाठी संघटन आवश्यक आहे, सर्वांच्या सहकार्याने प्रतिष्ठा महिला मंडळाची वाटचाल सुरू आहे. कुणाच्या तरी घरी दोन पैसे जातात, त्यांची दिवाळी साजरी होऊन आनंद मिळतो. आमच्यासाठी हेच समाधान आहे. दुसर्‍याला आनंद देणे हीच खरी आमच्यासाठी दिवाळी असल्याचे सूचक वक्तव्य आ. संजय सावकारे यांनी मनोगतात व्यक्त केले. सावकारे म्हणाले की, प्रतिष्ठा मंडळाला मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त असून सुरुवातीला महिलांना घरगुती वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले व या वस्तू बनवल्यानंतर त्या विक्रीसाठी मार्केटही उपलब्ध करून देण्यात आले. प्रत्येकाने पत्नीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यास महिला निश्चित सक्षम होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
 
 
                                                        काय-काय आहेतउद्योजक मेळाव्यात
दिवाळीचे फराळ, दिवाळी डेकोरेशन, आकर्षक दिवे, ज्वेलरी, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, सौंदर्य प्रसाधने, वेगवेगळे गिफ्ट्स आयटम, साड्या, रेडिमेड कपडे, ड्रेस मटेरियल आदी वस्तू उद्योजक मेळाव्यात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शिवाय खान्देशातील लज्जतदार पदार्थांची येथे रेलचेल आहे. शिवाय दररोज मेनू नाश्त्यासाठी उपलब्ध असल्याने खवैयांकडून या पदार्थांना चांगली मागणीही आहे.
@@AUTHORINFO_V1@@