दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांना मागणी वाढली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |
पारंपरिक पणत्यांकडे महिलांचा कल; खरेदीसाठी बाजारात गर्दी
 
 
जळगाव, 2 नोव्हेंबर - प्रकाशाचा उत्सव असलेला दीपावली सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. रोषणाईचे अतूट असे नाते असलेल्या हा सण प्रकाशाने उजळून काढण्यासाठी पारंपरिक आणि काही नव्या प्रकारातील आकर्षक आकाश कंदीलांनी बाजारपेठ सजली आहे.
 
 
चांदणी, पेशवाई, टोमॅटो बॉल, पॅराशूट यासह इको फ्रेंडली हॅण्डमेड आकाशकंदील यंदा बाजारात असून, कासव, मासा पणती, कंदील लाईटसह आकर्षक पणत्यांनाही मोठी मागणी वाढली आहे. सणांचा राजा असलेल्या दिवाळीच्या तयारीसाठी सार्‍यांची लगबग सुरू झाली असून, विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.
 
 
यानिमित्ताने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या या सणानिमित्त आकाश कंदील, पणत्यांची दुकाने जागोजागी थाटली आहे. आकाश कंदील लक्ष वेधून घेत असून यावर्षी आकाश कंदीलांचे पारंपरिक आणि काही नवे प्रकारही बाजारात दाखल झाले आहेत. बांबूच्या काड्यांपासून तयार करण्यात येत असलेले आकाश कंदील आता दिसेनासे झाले असून, चायनापेक्षा देशी बनावटीच्या आकाश दिव्यांना जास्त पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
 
50 ते 500 रुपयांपर्यंत कंदील उपलब्ध
 
रंगीबेरंगी कापडी, हॉलोग्राफी, मार्बल पेपर यासह फोल्डिंगच्या असंख्य प्रकारचे आकर्षक आकाश कंदील विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. यात पॅराशूट कंदील, आकाशदीप, फायर बॉल, कलश, टोमॅटो बॉल, हॅण्डमेड कापडी तसेच लहान आकाराच्या आकाश कंदिलांना चांगली मागणी असून, 50 ते 500 रुपयांपर्यंत भाव आहेत. जीएसटीमुळे गतवर्षीपेक्षा यंदा आकाश दिव्यांच्या किमती 8 ते 10 टक्क्यांनी वाढल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@