आरोग्यासाठी धावणे आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |
अ‍ॅड. चित्रे यांचा पत्रपरिषदेत जळगावकरांना सल्ला
जळगाव, 2 नोव्हेेंबर - आपला व्यवसाय सांभाळून प्रत्येकाने निरोगी आरोग्यासाठी नियमित धावणे आवश्यक आहे. त्यासाठी शरीरासह इच्छाशक्तीही हवी, असा सल्ला अ‍ॅड. सागर चित्रे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत दिला.
 
 
यावेळी डॉ. रवी हिराणी, जळगाव रनर्स गु्रपचे अध्यक्ष किरण बच्छाव, डॉ. विवेक पाटील, डॉ. प्रशांत देशमुख, विक्रांत सराफ, रवींद्र खैरनार, ज्ञानेश्वर बडे, कविता पाटील, विद्या बेंडाळे उपस्थित होते.
 
 
सप्तशृंगी येथे नुकत्याच झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत 46 ते 99 वयोगटातून बेंडाळे महिला महाविद्यालयातील कर्मचारी विद्या बेंडाळे (वय 58) तर 18 ते 35 वयोगटातून दिव्यांग कविता पाटील यांनी दुसरा क्रमांक मिळवला. त्यासाठी त्यांना कुटुंबातील सदस्यांनी प्रोत्साहन मिळत आहे,
 
तर अ‍ॅड. सागर चित्रे यांनी नुकत्याच झालेल्या महाबळेश्वर येथे 50 कि. मी. अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली आहे. त्यानिमित्त या पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.तिघांनी यावेळी आपले अनुभव व्यक्त करून रनर्स ग्रुपचे आभार व्यक्त केले. ‘खान्देश रन’ साठी नोंदणीसाठी आवाहन केले.
2 डिसेंबरला ’खान्देश रन’
 
जळगाव रनर्स गु्रप असोसिएशनतर्फे जळगावकरांसाठी 2 डिसेंबर रोजी ‘खान्देश रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन वयोगटात होत असून नोंदणी शुल्क आहे. आतापर्यंत 1700 च्यावर नोंदणी झालेल्या आहेत. स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, हे प्रमाणपत्र मुंबई येथे होणार्‍या मॅरेथॉनसाठी मानांकित आहे, असे डॉ.रवी हिराणी यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@