पालिका शताब्दी महोत्सव ऐतिहासिक व्हावा : आ. उन्मेश पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |
चाळीसगाव शताब्दी महोत्सव शोभायात्रेने दुमदुमले
 
 
चाळीसगाव - येथील नगरपरिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने नगरपरिषदेच्या वतीने शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा पहिला भाग म्हणून गुरुवारी सकाळी 11 वाजता टिळक चौकात लक्ष्मीनारायण मंदिर शोभायात्रेला आ. उन्मेश पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
 
 
 नगराध्यक्ष आशालता विश्वास चव्हाण यांनी पालिकेच्या लोगोचे विधिवत पूजन करून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. नगरपरिषदेला 19 ऑक्टोबर 1919 रोजी नारायणशेठ बंकट बुंदेलखंडी यांच्या रूपात प्रथम नगराध्यक्ष लाभले होते. या घटनेला या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहे.
 
 
गुरुवारी सकाळी शताब्दी महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. शहरातील शोभायात्रेत सर्व नगरसेवक आपल्या पत्नीसह उपस्थित होते. यावेळी पालिकेच्या वतीने तीन ट्रॅक्टर सजवण्यात आले होते. त्यावर पालिकेच्या विविध विकासकामांची छायाचित्रे लावण्यात आली होती. एका ट्रॅक्टरवर संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे बॅनर लावले होते. ट्रॅक्टरच्या दर्शनी भागावर नगरपरिषदेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेला नवीन लोगो लावण्यात आला होता. यावेळी नागरिकांचीही उपस्थिती होती.
 
ग़ुरुवारी सकाळी 10 वाजता निघालेली पालिका शताब्दी महोत्सव शोभायात्रा दुपारी दोन वाजता पोहोचली. शताब्दी महोत्सवानिमित्त पुढील वर्षभर विविध कार्यक्रमांबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानकर यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली.
 
 
याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता विश्वासराव चव्हाण नगरपरिषदेच्या शताब्दी महोत्सव फक्त पालिका कर्मचारी नगरसेवक, पदाधिकारी यांचा न ठरता संपूर्ण शहरवासीयांचा ठरावा, यासाठी सर्वांना येत्या वर्षभरात नागरिकांना सामील करून घ्यावे, असे सांगितले. नागरिकांनीदेखील पालिकेकडून महोत्सवात सादर केल्या जाणार्‍या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटावा व शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवून पालिकेचा शताब्दी महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@