पासधारक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |
 
 
 
जळगाव, 2 नोव्हेंबर - परिवहन महामंडळाने पासधारक विद्यार्थ्यांचे वय 25 वर्षांहून 30 वर्षांपर्यंत करावे, अशा मागणीचे निवेदन परिवहनमंत्री ना. दिवाकर रावते यांना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यामार्फत विद्यार्थ्यांनी दिले आहे.
 
 
विद्यार्थी 25 वर्षापर्यंतच पासधारक राहू शकतो, असा परिवहन महामंडळाचा नियम आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी जळगावला शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. जेव्हा त्या विद्यार्थ्याचे वय 26 वर्षे होते तेव्हा विद्यार्थ्यावर निर्बंध येतात. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षापासून वंचित राहतात, असे निवेदनात म्हटले आहे.
 
 
निवेदनावर जीवन चव्हाण, ईश्वर लोहार, समाधान चौधरी, दिनेश चव्हाण, दिलीप चव्हाण, विलास तडवी, अविनाश राठोड, शदर पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@