दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |

अभाविपची मागणी; राज्यातील विद्यार्थ्यांना कोट्यवधीचा लाभ
जळगाव, 2 नोव्हेेंबर- दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क तत्काळ माफ करावे, असे मागणी निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगावतर्फे कबचौ उमविचे कुलगुरू प्रा. डॉ.पी.पी.पाटील यांना दिले आहे.
 
 
राज्य यावर्षी पर्ज्यन्यवृष्टी कमी झाल्यामुळे दुष्काळाला तोंड देत आहे. महाराष्ट्र शासनाने दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन केले असता महाराष्ट्रातील 180 तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. सर्व परिस्थिती विचारात घेता महाराष्ट्र शासनाने त्या तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्याकरिता विविध सवलती लागू केल्या आहेत.
 
 
त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात यावी, असे नमूद केले आहे. ही बाब अभाविपच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंच्या लक्षात आणून दिली.तरी यासंदर्भातील परिपत्रक काढून पुढील प्रक्रिया त्वरित राबवावी, अशी मागणी अभाविच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंना केली. या निर्णयाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होईल, असेही अभाविपच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंना सांगितले.
 
 
यावर कुलगुरू पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासनाचे पत्रक प्राप्त झाल्यावर लगेच परीक्षा शुल्क माफीची प्रक्रिया राबवण्यात येईल, असे आश्वासन अभाविपच्या शिष्टमंडळाला दिले.
महानगर मंत्री रितेश चौधरी, हर्षल तांबट, सोहम पाटील, अश्विन सुरवाडे, विराज भामरे यांचा समावेश शिष्टमंडळात होता.
                                                                    या आहेत प्रमुख मागण्या
ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचे बाकी आहे; त्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क महाविद्यालयाने आकारू नये, तसे आदेश आपण संलग्नित महाविद्यालयांना द्यावेत. ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे, त्या विद्यार्थ्यांना त्वरित प्रक्रिया राबवून परीक्षा शुल्क परत करावे व दुष्काळाशी लढण्याचे सामर्थ्य द्यावे.
@@AUTHORINFO_V1@@