डेंग्यू हद्दपारसाठी आरोग्य विभाग सरसावला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |
जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांची भेट

 
 
पारोळा, 2 नोव्हेंबर- शहरातील व्यंकटेशनगर, पेंढारपुरा, स्वामिनारायणनगर या परिसरात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे प्रत्येक भागात मोहीम राबवून कंटेनर सर्वेक्षण अबेटिंग रक्तजल नमुने घेणे, धुरळणी करणे सर्व कार्यवाही आरोग्य विभागामार्फत केली होती.
 
 
आताही अंकुर हॉस्पिटलमधील डेंग्यूसदृश रुग्णांची माहिती मिळाल्यावर लागलीच कंटेनर सर्वेक्षण सुरू केले. यात सी. आर. बागुल आरोग्य पर्यवेक्षक, वायू पाटील आरोग्य सहाय्यक, प्रवीण बाविस्कर, संदीप पाटील यांच्या मदतीने दररोज वेगवेगळ्या भागात सर्वेक्षण सुरू आहे.
 
 
यात व्यंकटेशनगर, पाताळेश्वर मंदिर परिसर, पेंढारपूर, शनी मंदिरचा भाग, कोष्टी गल्ली, बेलदार मशीद, विजयानंद हॉस्पिटल परिसर या सर्व भागांमध्ये नगरपालिकेकडून धुरळणी करण्यात आली. जवळजवळ 1000 घरांचे सर्वेक्षण करण्यात करण्यात आले. डेंग्शूसदृश रुग्णांची विचारपूस करण्यात आली.प्रतिबंधात्मक उपाययोजने विषयी माहिती देण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी स्वतः व्यंकटेशनगर भागाला भेट दिली.रुग्णांच्या घरी जाऊन विचारपूस करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
 
 
सध्या परिस्थिती नियंत्रणात
शहरातून 6 डेंग्यूसदृश रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. नियमित वेगवेगळ्या भागात सर्वेक्षण सुरू असून नगरपालिकेला धुरळणीच्या सूचना देण्यात येत आहेत व रोज धुरळणी सुरू आहे. आता सद्यःस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे.
डॉ.तुषार मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी
@@AUTHORINFO_V1@@