शिंदखेड्यात रमाई घरकुल योजनेचा लाभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |

 
 
शिंदखेडा, 2 नोव्हेंबर - येथील नगरपंचायतीने रमाई घरकुल योजनेचा लाभार्थींंना शुक्रवारी मंजूर झालेल्या रकमेची माहीती दिली. रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली.
 
 
शुक्रवारी नगरपंचायतीचे समाज मंगल कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत सन 2015-16 मध्ये 88 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून यात 70 लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर झाले होते. या योजनेस पूर्वी 1 लाख 50 हजारांचे अनुदान होते. आता 1 लाख रुपये वाढीव झाले असून एकूण 2 लाख 50 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
 
यातील 31 लाभार्थ्यांनी रमाई घरकुल योजनेचे संपूर्ण काम पूर्ण केल्याने त्यांना उर्वरित रक्कम 1 लाख 15 हजार तर 10 लाभार्थी यांचे शौचालयाचे काम राहिल्याने त्यांना 1 लाख रुपये देण्यात आले आहे. 29 प्रगतीपथावर असलेल्या लाभार्थ्यांना 50हजार रुपायाचे अनुदान देण्यात आले.
 
 
नगराध्यक्षा रजनी वानखेडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन विवेक डांगरीकर यांनी केले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, गटनेते अनिल वानखेडे, मुख्याधिकारी अजित निकम, काँग्रेसचे गटनेते सुनील चौधरी, नगरसेवक किसन सकट, उदय देसले, दीपक आहीरे, चेतन परमार, प्रवीण माळी, शिवसेनेचे संतोष देसले, सागर देसले यांसह लाभार्थी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@