आशा फाउंडेशन व युवाशक्तीतर्फे ‘किल्ले बनवा’ स्पर्धा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |

 
 
जळगाव, 2 नोव्हेंबर - दिवाळीच्या सुटीत विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व कौशल्याला वाव मिळावा तसेच भारताचा ऐतिहासिक ठेवा असलेले किल्ले, त्यातील स्थापत्य कलेचे महत्त्व त्यांना समजावे, या वास्तूंचे जतन व संवर्धन व्हावे, जनजागृती व्हावी या उद्देशाने आशा फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
 
 
3 व 4 नोव्हेंबर रोजी स्पर्धा आणि 5 ते 7 नोव्हेंबर कालावधीत प्रदर्शन राहणार आहे. काव्यरत्नावली चौकात होणार्‍या या स्पर्धेचे उद्घाटन 3 रोजी, सायंकाळी 4.30 वाजता होणार असून 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता त्याचे परीक्षण करण्यात येईल.
स्पर्धा सांघिक स्वरुपाची असून शालेय छोटा, मोठा व खुल्या गटासाठी घेण्यात येणार आहे.
 
 
एका संघात 5 स्पर्धकांचा समावेश असावा. स्पर्धेसाठी माती, पाणी व जागा आयोजकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किल्ले बनविण्यासाठी व सजविण्यासाठी लागणारे साहित्य स्पर्धक संघाने आणायचे आहे. संघाने दिलेल्या वेळेत, जागेत किल्ला बनवायचा आहे. प्रथम एकूण 40 संघांनाच स्पर्धेत सहभाग देता येणार आहे.
 
 
स्पर्धक संघाने आपल्या गटाची नोंदणी करणे आवश्यक आहे. तिन्ही गटात सहभागी प्रथम 5 संघांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्पर्धेसाठी महापालिका, भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशन, राजेश टेन्ट हाऊस व प्रशांत फाउंडेशन यांचे सहकार्य लाभत आहे. माहितीसाठी 2262080 किंवा 9421708019 या क्रमांकावर संपर्क साधावा.
@@AUTHORINFO_V1@@