‘आकृती म्युरल आर्ट’ला रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |

 
जळगाव, 2 नोव्हेंबर - जळगाव येथील पी.एन.गाडगीळ अँड सन्स यांच्या कलादालनात चित्र-शिल्पकार आणि ललित कला महाविद्यालयातील प्रा. राज गुंगे यांच्या मुरल्स आर्टचे उद्घाटन जळगाव शहराच्या महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी दुसर्‍याच दिवशी रसिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला.
 
 
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. धनराज भारुडे यांनी प्रा. राज गुंगे यांची कलेबद्दल असलेली निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर आजवरचा त्यांचा प्रवास वर्णन केला, त्याचे भारुडे साक्षीदार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. दरम्यान, या कलाकृती तयार करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला असल्याचे प्रा.गुंगे यांनी सांगितले.
 
 
कलाकृतीमध्ये वूड या माध्यमात तयार केलेल्या कलाकृती असून यात वूड कार्व्हिंग, फिनिशिंग, रंगलेपन, पोतनिर्मिती करून सौंदर्य वाढवले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रा. राज गुंगे यांचा प्रा. धनराज भारुडे, प्रा. धनंजय कोल्हे, चित्रकार राजू बाविस्कर, प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, चित्रकार मनोज जंजाळकर, सुरेंद्र कोचुरे यांनी सन्मान केला.
 
 
यावेळी चोपडा शहराचे नगराध्यक्ष जीवनदादा चौधरी, पोलीस निरीक्षक बापू रोहोम, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. निलेश चांडक, डॉ. स्नेहल फेगडे आणि दूरदर्शनचे मिलिंद पाटील उपस्थित होते.
 
 
सूत्रसंचालन जगदीश नेवे यांनी केले तर आभार प्रा. राज गुंगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य जितेंद्र भारंबे, योगेय सुतार, प्रेम सारस्वत, जयेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@