‘वॉक फॉर चाळीसगाव’चा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |

चाळीसगाव - येथील न. पा. च्या शताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी ‘वॉक फॉर चाळीसगाव’ची सुरुवात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली.
 
 
आ. उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रांत शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, बीडीओ अतुल पाटील, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपसभापती संजय पाटील, उपाध्यक्षा आशा चव्हाण, नगरसेवक, नगरसेविका, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पं.स.कार्यालय, न.पा.अधिकारी, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, महिला, पुरुष, युवक मान्यवर उपस्थित होते.
 
 
‘वॉक फॉर चाळीसगाव’ ची सुरुवात ग्रामदैवत आनंदा मातेच्या मंदिरापासून करण्यात आली. तर समारोप नवीन न.पा. इमारतीच्या आवारात करण्यात आला. यावेळी नागरिक उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@