शेअर बाजार तेजीवर स्वार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2018
Total Views |
 

मुंबई : मजबूत झालेला रुपया, अमेरिकेच्या बाजारातील तेजी याचा परिणाम गुरुवारी शेअर बाजारावर जाणवला. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे दोन्ही निर्देशांकांमध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४५३ अंशांनी वधारत ३६ हजार १७० रुपयांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३० अंशांनी वधारत १० हजार ८५९ अंशांवर पोहोचला.

 

अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरावाढी बद्दल नरमाईची भूमिका घेतल्यानंतर जागतिक शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपयानेही चांगली कामगिरी केली. कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्याने रुपया ७४ पैशांनी मजबूत होऊन ६९.८८ रुपयांवर पोहोचला.

 

बजाज ऑटो, कोटक महिंद्रा, महिंद्र एण्ड महिंद्रा, वेदांता, इंडसइंड बॅंक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बॅंक, रिलायन्स, एचयुएल, एचडीएफसी, आयटीसी, टाटा स्टील आणि टाटा मोटार आदी शेअर पाच टक्क्यांपर्यंत वधारले. दरम्यान, ओएनजीसी, पावरग्रीड, एनटीपीसी, इन्फोसिस, येस बॅंक, सन फार्मा आदींमध्ये दोन टक्क्यांपर्यंत घसरण झाली. गुरुवारच्या सत्रात बाजारात ९६१.२६ कोटी रुपयांची परकी गुंतवणूक झाली. स्थानिक गुंतवणूकदारांनी ३३०.२९ कोटी रुपयांची विक्री केली. बॅंकींग, मोटार, मेटल आदी क्षेत्रातील खरेदीमुळे दोन्ही निर्देशांकांना बळ मिळाले. मात्र, चौफेर खरेदीनंतरही आयटी क्षेत्रात घसरण झाली.

 

रिलायन्सचा शेअर २ टक्क्यांनी वधारल्याने पुन्हा एकदा सर्वाधिक बाजार भांडवल असलेली कंपनी बनली. रिलायन्सचा शेअर १ टक्क्यांनी वधारुन खुला झाला. अखेरच्या सत्रात तो दोन टक्क्यांनी वधारत ११७० रुपयांवर स्थिरावला. टीसीएसने मंगळवारी ही कामगिरी केली होती. मात्र, टीसीएसला पुन्हा मागे टाकत रिलायन्स अव्वल स्थानावर पोहोचली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@