वरणगाव न.प.त मुख्याधिकारीसह रिक्त पदे भरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2018
Total Views |

ना. महाजन यांच्या प्रधान सचिवांना सूचना : पदे भरणार असल्याचे म्हस्कर यांचे आश्‍वासन

 
वरणगाव  :
नगरपरिषदेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी व विविध बांधकाम, इलेक्ट्रिक लेखा, अभियंता व अधीक्षक ह्या जागा रिक्त आहे. त्यामुळे विकासकामे करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येताहेत. नगरपरिषदेचे सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, यासाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आज विधान भवनात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे गळ घातली. तत्काळ ना. गिरीश महाजन यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनीषा म्हस्कर यांना प्रत्यक्ष बैठकीत सांगितले की, वरणगावची लोकसंख्या ५० हजारांच्या जवळपास असून नागरिकांची विविध कामांसाठी कायमस्वरुपी मुख्यधिकारी व इतर पदे नसल्याने जनतेचे हाल मोठ्या प्रमाणात होता आहे. तरी त्वरित वरणगाव नगरपरिषदेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्यात यावा तसेच बांधकाम अभियंता, इलेक्ट्रिक अभियंता लेखाधिकारी, कार्यालयीन अधीक्षक यासह रिक्त पदे व नगरपरिषदेचा कर्मचारी यांचा आकृतिबंध १०० टक्के भरणे आवश्यक आहे. कर्मचारी आंदोलन करता आहे, त्यांच्या परिस्तिथीकडे आपण तत्काळ लक्ष घालून कर्मचारी यांचे १०० टक्के समायोजन करावे अशा सूचना आज नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनीषा म्हस्कर व उपसंचालक नगरविकास विभाग डी. पी. मोरे यांना दिल्या.
 
 
ही रिक्त पदे तत्काळ भरल्यास नक्कीच वरणगावात विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडणार असून विकासाचा जोर अधिक वाढण्यास मदत होणार आहे. या वेळी प्रधान सचिव मनीषा म्हस्कर यांनी तत्काळ वरणगावला कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्याचे व इतर रिक्त पदे तत्काळ भरण्याचे मंत्री महोदय ना. गिरीश महाजन यांना सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@