नवज्योत सिंग सिद्धू...राजीनामा द्या !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2018
Total Views |
 


 

नवी दिल्ली : कर्तारपूरच्या गुरुद्वारा दरबार साहिबला जोडणाऱ्या मार्गिकेतील पायाभरणीच्या समारंभात खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावला उपस्थित होता. इतकेच नव्हे तर पंजाबमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह चावलाने फोटोही काढला. यामुळे सिद्धु यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सिद्धूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अकाली दल अन्य विरोधी पक्षांकडून ही मागणी केली जात आहे.

 

पाकिस्तानातील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब हे नानकदेवांचे समाधीस्थळ आणि भारतातील गुरुदासपूर येथील डेरा बाबा नानक हे ऐतिहासिक मोलाचे स्थान थेट जोडले जाणार आहे. या मार्गिकेचे काम सहा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता असून या मार्गिकेचा पायाभरणीचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. चावलाचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांची भेट घेतानाचा फोटोही प्रसिद्ध झाला आहे. यावर पाकिस्तानी लष्कराने ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले. लष्कर प्रमुखांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांचीच भेट घेतली. याचा वेगळा अर्थ काढू नये, असेही यावेळी सांगितले.

 
 
 
 

दिल्लीचे आमदार मजिंदर सिंग सिरसा यांनी याबाबत ट्विट केले आहे. आम्हाला आणखी किती लाज आणणार आहात, असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, भारतातर्फे नवज्योसिंग सिद्धू, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी हे सहभागी होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नवज्योतसिंग सिद्धूंचे भरभरुन कौतुक केले. मात्र, नेहमीप्रमाणे सिद्धूंचा हा दौराही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कार्यक्रमात पाकिस्तानातील दहशतवादी हाफिज सईदशी संबंधित आणि खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावला हा उपस्थित असल्याचे उघडकीस आले आहे. सिद्धूंसोबतचे चावलाचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले असून यावरुन विरोधी पक्षांनी सिद्धूंवीर टीका केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@