तो काळ परीक्षेचाच...परिवारातील तिघे भाऊ कारागृहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2018
Total Views |

जळगावचे कर सल्लागार श्यामसुंदर कलभंडे यांच्या कुटुंबाची वैचारिक सत्वपरीक्षा, आई-वडील मात्र खंबीर

 
 
जळगाव :
‘आणीबाणीचा काळ परीक्षेचाच होता... परिवारातील तिघे भाऊ कारागृहात होते तरी आई-वडील खंबीर होते. वैचारिक निष्ठा एवढी होती की, घर विस्कळीत झाले तरी त्याचा त्रास करून घेतला नाही...’ अशी दमदार, दुर्मीळ भावना आहे, जळगावचे करसल्लागार श्यामसुंदर नारायण कलभंडे यांची.
 
 
८ जानेवारी ७६ ते २१ मार्च ७७ या कालावधीत नाशिकरोड कारागृहात स्थानबद्ध होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना वर्षाच्या शंभरीकडे वाटचाल आणि कार्याचा व्यापही वाढता का?...याचे उत्तर या भावनेत दडलेले आहे. एकाच सामान्य परिवारातील तिन्ही भाऊ कारागृहात डांबण्यात आले पण तरीही त्यांच्या मातापित्यांनी न डगमगता आपली वैचारिक बांधिलकी कायम राखण्याचे आणि वर खंबीर राहत इतरांना धीर दिला. हे जाणून मन अभिमानाने भरून जाते.
 
 
३ भावांनी खंबीरतेने कारावास सोसण्याचे हे दुर्मीळ उदाहरण. राज्यात व देशात असे क्वचितच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत परिवार असतील. एखाद्या परिवाराचे वैचारिक निष्ठेचे हे कोडे मानसशास्त्रही सोडविल की नाही...याची शंका वाटते. रामचंद्र, सुधाकर (वाणिज्य शाखेचे पदवीधर) आणि श्यामसुंदर हे तिन्ही बंधू व्यवसायाने करसल्लागार... तिघांचे कार्यालयही एकच, बॉम्बे लॉजच्या परिसरात. श्याम हे जळगावातील मध्यवर्ती व सुंदर देखण्या, निसर्गसुंदर हौसिंग सोसायटीत (जिल्हा न्यायालयामागे) ‘सौरभ’ प्लॉट क्रमांक ५२ येथे ते राहतात.
 
 
त्यांचा जन्म १७ डिसेंबर १९४६ जळगावचा. शिक्षण ला. ना. विद्यालयात आणि पोदार महाविद्यालयाचे ते वाणिज्य पदवीधर. चित्रकला (त्यातही पोट्रेट), क्रिकेट आणि मैत्री करणे हे त्यांचे विशेष छंद. घराजवळच्या शाहूनगर प्रभात शाखेचे ते स्वयंसेवक. आणीबाणीपूर्वी जळगाव महानगराच्या संघरचनेनुसार केलेल्या ६ विभागांपैकी एका विभागाचे ते प्रमुख होते.
 
 
८ जानेवारी ७६ रोजी त्यांना अटक झाली, त्यावेळी ते अविवाहित होते. घरी आई इंदिराबाई, वडील नारायणराव आणि मोठेबंधू रामचंद्र हे मिसाखाली येरवडा कारागृहात स्थानबद्ध होते. मोठे बंधू रामचंद्र हेही करसल्लागार...त्यांना ४ जुलै ७५ ला अटक करण्यात आली. विसापूर व येरवडा कारागृहात त्यांना ठेवण्यात आले होते. मधले बंधू सुधाकर हे जनसंघाचे निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांनी आणीबाणीच्या निषेधार्थ २८ नोव्हेंबर १९७५ ला काही कार्यकर्त्यांसमवेत सत्त्याग्रह केला. नाशिक कारागृहात त्यांना पाठवण्यात आले. ते अकोला येथे कारागृहात होते. बहीण सौ. नलिनी प्रकाश देशपांडे (पुणे) यांची प्रसूती झालेली होती.
कारागृहाबाहेर पडणार कधी ... प्रश्‍न पडे पण भीती नव्हती...
नाशिकला तर १२०० कैद्यांमध्ये अनेक दिग्गज होते. प्रांत संघचालक बाबाराव भिडे, प्रल्हादजी अभ्यंकर व मलकापूरचे अर्जुनराव वानखेडे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, शरदराव कुळकर्णी या दिग्गजांसह जळगावचे रघुजी रारावीकर, बाबा जोगदेव, पेशुराम कुकरेजा, दिनेश जोशी, कुशाभाऊ पुंडे, अनिल अभ्यंकर अजित मेंडकी, सारंग मेलग आदी होते. सकाळी एकत्रीकरण, व्यायाम, योगासने, नाश्ता, जळगावचे ऍड. रमेश गुप्ते यांच्या मदतीने स्थानबद्धांच्या पॅरोलची कामे, दुपारी जेवण, थोडी विश्रांती, बौद्धिक, नंतर फिरणं, गाठीभेटी होत. घरच्यांची आठवण यायची...बाहेरचा मोकळा श्‍वास कधी घेता येणार?...हा विचार मनात यायचा...चर्चाही व्हायची...पण त्यांना भीती कधीच वाटली नाही.
 
श्याम यांना अटक
विक्रीकर कार्यालयात कामासाठी गेले असताना शाम यांना बोलावून घेत पोलिसांनी अटक वॉरंट बजावले. पोलीस ठाण्यात बोलावल्याचे सांगितले आणि कपडेलत्ते घेण्यासाठी तासाभराची सवड देत अटक झालीही. आणि नाशिकला रवानगी झाली.
 
वहिनी अस्वस्थ आणि मुलं बावरलेली,
आई-वडील खंबीर आणि शांत
आणीबाणीत तीनही मुलं कारागृहात असली तरी आई इंदिराबाई (स्वर्गवास ???? मध्ये) आणि वडील नारायणराव हे एवढे खंबीर होते की, त्यांनी अन्य कार्यकर्त्यांच्या परिवाराला धीर दिला. याचे कारण होते नारायणराव हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निष्ठावंत समर्थक. हिंदू महासभेचे कार्यकर्ते आणि गांधीजींच्या खुनानंतर १९४८ मध्ये १५ दिवस कारावासात होते. यामुळे त्यांची भूमिका ठाम, सुस्पष्ट व परखड होती. ते म्हणायचे की ‘आपल्या मुलांनी गुन्हे थोडीच केले आहेत?’ काही मित्र, कार्यकर्ते घरी येत आई-वडिलांना धीर द्यायचे. धीर देत सांभाळले. पण रामचंद्र यांच्या पत्नी रोहिणी या अस्वस्थ होत्या आणि साहजिकही होते ते. तर पुतणे मात्र वयाने लहान असल्याने बावरलेले होेते.
 
 
सुटका...
कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यावर आणीबाणी उठवण्यात आली. जनता पक्ष सत्तेवर आल्याने सर्वच जण आनंदले होते. अन् २१ मार्च ७७ ला सुटका झाली..अमृतसर एक्स्प्रेसने/दादर-नागपूर रेल्वेने आणि येरवड्यातील स्थानबद्ध महाराष्ट्र एक्स्प्रेसने जळगावला आले...मग जल्लोषपूर्ण मिरवणुकीने वाजत-गाजत सर्व जण सिंधी कॉलनीत पोहोचले. तेथे संत बाबाहरदासराम यांचे दर्शन घेऊन सायंकाळी ते घरी परतले.
सध्या त्यांच्या परिवारात पत्नी वैजयंती, मुलगा सचिन (करसल्लागार) आणि मुलगी जुईली या आहेत. सचिन यांचे जी-१० गोलाणी मार्केट येथे कार्यालय आहे तर जुईली या भावमधूर गायनासाठी ओळखल्या जातात.
 
- (श्यामसुंदर नारायण कलभंडे
९४२३१ ४९७९४)
 
@@AUTHORINFO_V1@@