कागदविरहीत गो-ग्रीन वीजबिल भरण्याचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2018
Total Views |

महावितरणकडून १ डिसेंबरपासून १० रुपयांची सवलत


 
 
जळगाव :
ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबिल १० रुपये सवलत दिली जाणार आहे.
 
 
महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती व वीजबील भरण्यासाठी मोबाईल व www.mahadiscom.in यावर ऑनलाईनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबिलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ई-मेल व एसएमएसद्वारे वीजबिल उपलब्ध करून दिले जाते. या सर्व ग्राहकांना १ डिसेंबरपासून प्रतीबिल १० रुपये सवलत मिळणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांना आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईलद्वारे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर हींींिी://लळश्रश्रळपस.ारहरवळीलेा.ळप/सेसीशशप.हिि जाऊन करावी लागणार आहे.
 
 
गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबिल मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे. तसेच गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे. वीज ग्राहकांनी जास्तीत जास्त कागदविरहीत गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@