सुषमा स्वराज यांच्याकडून पाकची कानउघडणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2018
Total Views |
 
 
 

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सीमेपलीकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत त्यांच्याशी कोणताही संवाद साधला जाणार नसल्याचे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला खडेबोल सुनावले आहेत. पाकच्या कुरापती थांबत नाहीत तो पर्यंत या देशाशी कोणताही संवाद साधला जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सुषमा स्वराज यांनी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

त्या म्हणाल्या, ''दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबत नाहीत तो पर्यंत यापुढे पाकशी चर्चा नाही. पाकिस्तानसोबत कोणताही संवाद साधला जाणार नाही. भारत सार्क परिषदेला उपस्थित राहणार नाही''. पाकच्या कुरापतींमुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले जात आहेत. स्वराज यांनी पाकिस्तानच्या इस्माबादकडून देण्यात आलेले आमंत्रण स्वीकारले नाही, त्यापार्श्वभूमीवर त्यांनी पसारमाध्यमांशी संवाद साधला.

 

कर्तापूर कॉरिडोरबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ''काही वर्षांपासून केंद्र सरकारकडून कर्तापूर कॉरिडोरबाबत विचारणा सुरू आहे. पाकिस्तानकडून याबाबत सकारात्मक उत्तर मिळत आहे. याचा अर्थ द्विपक्षीय चर्चा सुरु होणार असा नाही. दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही"., अशा शब्दांत त्यांनी पाकचा समाचार घेतला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@