सेन्सेक्सची द्विशतकी झेप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2018
Total Views |
 

मुंबई : आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २०४ अंशांनी वधारत ३५ हजार ७१६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४३.२५ अंशांनी वधारत १० हजार ७२९च्या स्तरावर पोहोचला. निफ्टीच्या मंचावर टीसीएस सर्वाधिक कमाई करणार शेअर ठरला. तो पाच टक्क्यांनी वधारत १९८४च्या स्तरावर बंद झाला.

 

याशिवाय इन्फोसिस .३० टक्के, झी एंटरटेन्मेंट टक्के, रिलायन्स .१७ टक्के, एचसीएल टेक्नॉलोजी टक्के वधारले. दरम्यान मुडिजने येस बॅंकचे मानांकन घटवल्यानंतर शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. बाजार उघडताच पाच टक्क्यांनी घसरला. त्यानंतर शेवटच्या सत्रात ११ टक्क्यांनी घसरत १६२च्या स्तरावर बंद झाला. कच्च्या तेलातील दरांच्या घसरणीमुळे इंडियन ऑईल कोर्पोरेशन, बीपीसीएल, एचपीसीएल आदी शेअर घसरले. याशिवाय भारती एअरटेल आणि टाटा मोटारमध्येही सर्वाधिक घसरण झाली.

 

रुपयाची घसरण

 

बुधवारी बाजार उघडल्यावर डॉलरच्या तुलनेत १२ पैशांनी घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपया ७०.८८ रुपयांवर कामगिरी करत होता. दिवसअखेर तो ७०.७६च्या स्तरावर बंद झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@