सिग्‍नल शाळेच्‍या मदतीसाठी धावणार ठाणेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2018
Total Views |



ठाणे : शिक्षणाचा अधिकार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा, या उद्देशासाठी हिरानंदानी इस्टेट येथील रॅडक्लिफ सीबीएसई शाळेने पाच किमी मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत सायक्लोथॉन व स्केटिंग स्पर्धाही होणार असून मॅरेथॉनच्या माध्यमातून मिळणारा निधी समर्थ भारत व्यासपीठच्या सिग्नल शाळेला दिला जाणार आहे. यावेळी हिंदुस्थानची धावपटू ललिता बाबर या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

 

ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट भागात असलेल्या रॅडक्लिफ सीबीएसई शाळेने येत्या २ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता या ५ किमी अंतराच्या मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. यासोबतच ज्येष्ठांसाठी ३ किमी अंतराची 'फन रन' तसेच ५ किमीची सायक्लोथॉन व २ किमीची अनोखी स्केटिंग स्पर्धा यावेळी होणार आहे. शाळेपासून या प्रत्येक स्पर्धेची सुरवात होणार असून विजेत्यांना आकर्षक पारितोषके व सर्व स्पर्धकांना मेडल प्रदान करून सन्मानित केले जाईल. या मॅरेथॉनच्या मेडल्स व टीशर्ट्सचे अनावरण शाळेच्या रिजन हेड स्वाती मुखर्जी व मुख्याध्यापिका नयना चवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिगदर्शक विजू माने, समर्थ भारत व्यासपीठचे भटू सावंत, मॅरेथॉन समन्व्यक संकेत खरारे, निकुंज नयना तसेच राजू वर्मा, किरण चव्हाण, पुष्कर देसाई, सुनील भट, ध्वनी पंजाबी आदी धावपटू उपस्थित होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@