दहशतवादाविरोधात चकारही नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2018
Total Views |

 

इस्लामाबाद ः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याहस्ते करतारपूर कॉरिडोरचे बुधवारी भूमीपूजन झाले. यावेळी इम्रान खान यांनी भारत-पाक मैत्रीपूर्ण संबंध, काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. मात्र, दहशदवादविरोधाबाबत त्यांनी चकारही काढला नाही. भारत पाक संबंधावर बोलताना ते म्हणाले, जर्मनी आणि फ्रान्स या सीमाप्रश्नावर एकत्र येऊ शकतात तर भारत-पाक का नाही, तर भारत-पाकिस्तान का नाही?, असे म्हणत खान यांनी भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. भारत-पाक लढाई होणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला. करतारपूर कॉरिडोर खुली करणे म्हणजे मदीनाची सीमरेषा खुली करण्यासारखे आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले.

 

२६/११च्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनेही भारताला दहशतवादाविरोधातील कारवायांसाठी पाठींबा दर्शवला होता. त्यादृष्टीने आजचे इम्रान खान यांच्या भाषणाकडे देशाचे लक्ष होते. मात्र, यावर बोलणे इम्रान यांनी टाळत केवळ काश्मिर प्रश्नावर बोट ठेवले. पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा नानक शाहपासून करतारपूरपर्यंत कॉरिडॉर बांधण्याची मागणी शीख समुदायाकडून बऱ्याच कालावधीपासून होत होती. याबाबत, भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान सरकारनेही भारताच्या या भूमिकेचे स्वागत केले. आज पाकिस्तानच्या करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला भारताच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकशी जोडण्यात येणारे पहिले पाऊल उचलण्यात आले.

 

पाकिस्तानमध्ये करतारपूर साहिब हे प्रार्थनास्थळ रावी नदीपलिकडील डेरा बाबा नानक यांच्यापासून चार किमी अंतरावर आहे. शिख गुरूंनी १५२२ मध्ये या गुरूद्वाराची स्थापना केली होती. पहिला गुरुद्वारा, गुरुद्वारा करतारपूर साहिब येथे उभारण्यात आला होता. येथेच गुरू नानक यांनीही आपल्या आयुष्यातील शेवटचे क्षण व्यतीत केले होते. या कार्यक्रमात बोलताना हिंदू जीवे, पाकिस्तान जीवे अशी घोषणा भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली. दरम्यान, या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री हरसिमरत कौर बादल उपस्थित होत्या. आज शीख धर्मीयांसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगताना कौर अतिशय भावूक झाल्या होत्या.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@