भारताने फेटाळले सार्क परिषदेचे निमंत्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2018
Total Views |



नवी दिल्ली : सार्क परिषदेसाठी पाकिस्तानने भारताला निमंत्रण दिले. पण या परिषदेला पंतप्रधान मोदी जाणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच इतर सात देशांना न विचारता सार्क परिषद भरवणारा आणि निमंत्रण देणारा पाकिस्तान कोण असा सवाल भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या सार्क परिषदेसाठी भारताच्या वतीने कोणीही इस्लामाबादेत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

 

'दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना' अर्थात ‘सार्क’मध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे. या संघटनेच्या ध्येय धोरण निश्चितीमध्ये अफगाणिस्तान,भारत , बांग्लादेश,पाकिस्तान आणि श्रीलंका महत्त्वाची भूमिका बजावतात. गेल्या ३२ वर्षात फक्त १८ वेळा सार्कचे सदस्य राष्ट्र एकत्र आले. २०१६ मध्ये पाकिस्तान येथे होणारी १९ वी शिखर परिषद भारतासह बांग्लादेश, भूतान, अफगाणिस्तान यांनी बहिष्कार टाकल्याने रद्द झाली होती. याला उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात सार्कची एकही बैठक झाली नाही.

 

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे भारताशी चर्चा करण्यास उत्सुक त्यांनी यापूर्वी देखील मंडळी होती. नुकतेच भारतीय शिखांसाठी पाकिस्तानातील 'करतारपूर गुरुद्वारे'चे दरवाजे खुले करण्यात आले. शिख धर्माचे संस्थापक गुरू नानक १८ वर्षं या गुरुद्वारेत वास्तव्य केले होते. करतारपूरचे दरवाजे उघडणे दोन्ही देशांचे संबंध सुधारू शकतात असे वक्तव्य खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. हेच संबंध अधिक चांगले करण्यासाठी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेचे निमंत्रण भारताला देण्यात आले. मात्र भारताने हे निमंत्रण फेटाळून लावले आहे.

 

"सार्क हा आठ देशांचा समूह आहे. त्यामुळे परिषद कुठे होणार याचा निर्णय सगळे देश मिळवून ठरवतात. तेव्हा तारीख, जागा काहीही ठरले नसताना सार्क परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी पाकिस्तान 'सार्क' समितीचे नेतृत्व करत नाहीत. सर्व देशांनी हिरवा कंदील दाखवल्यावरच सार्कची संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू होईल." अशी घोषणा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@