पुण्यात लागली भीषण आग; १०० घरे भस्मसात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2018
Total Views |


 


पुणे : पुण्यामध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळत आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग लागली असून १०० हुन अधिक झोपडपट्या यामध्ये जाळून खाक झाल्या आहेत. पुणे, पिंपरी आणि कॅंटोन्मेंटमधल्या सुमारे ३० अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. झोपडपट्टीतील क्रमांक ३ च्या गल्लीमध्ये दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली.

 

आज दुपारी १२ ते १ च्या दरम्यान झोपट्टीमध्ये ही आग लागली. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सहा वर्षापूर्वी देखील अशीच घटना याच ठिकाणी घडली होती. पाटील इस्टेट झोपडपट्टीत जवळपास ४०० घर आहेत. संपूर्ण झोपडपट्टी रिकामी करण्यात आल्याची माहिती आहे. जुन्या पुणे-मुंबई मार्गावर ही पाटील इस्टेट झोपडपट्टी आहे. सहा ते सात सिलेंडरचे स्फोट झाल्यामुळे आग आणखी भडकली. अरुंद रास्ता, जमलेली गर्दी यामुळे अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडथळे येत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@