चीनला साक्षात्कार; पाकव्याप्त काश्मीरचा भारतात समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2018
Total Views |


 


बीजिंग : चीनने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील प्रदेशाचा समावेश भारताच्या नकाशामध्ये केला आहे. चीनची सरकारी वृत्तवाहिनी चायना ग्लोबल टेलीव्हिजन नेटवर्क न्यूजने मंगळवारी संध्याकाळी वार्तांकन करताना पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशाचा भाग असल्याचे दाखवले आहे. आत्तापर्यंत काश्मीरच्या प्रश्नावर पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या चीनची भूमिका बदलत असल्याचे मानले जात आहे.

 

चीनमधली सरकारी प्रसारमाध्यमे चिनी सरकारची अधिकृत भूमिका मांडत असल्यामुळे हा बदल चीन सरकारच्या सांगण्यावरूनच करण्यात आला असावा अशी शक्यता आहे. चायना ग्लोबल टेलीव्हिजन नेटवर्क न्यूज हे चिनी सरकारच्या मालकीचे आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनेल आहे. त्यांनी पाकिस्तानमधील चीनच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्याचे वार्तांकन करताना या वृत्तवाहिनीने पाकिस्तान व भारत हे देश या नकाशात दाखवले. पाकव्याप्त काश्मीरचा समावेश पाकच्या नकाशात करण्यात आला नसल्याचे यावेळी स्पष्ट दिसून आले. आत्तापर्यंत चीन कायम पाकव्याप्त काश्मीर नकाशामध्ये पाकिस्तानमध्ये दाखवत आला आहे. भारताने यासंदर्भात अनेकवेळा आक्षेपही घेतला होता. मात्र, चीनने कधीही भारताची दखल घेतली नव्हती. आता प्रथमच हा बदल झालेला दिसत आहे.

 

‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर’चा परिणाम

 

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. भारताची परवानगी न घेता पाकव्याप्त काश्मीरमधून हा महामार्ग बनवला जात असल्यामुळे भारताने या प्रकल्पाचा कडाडून विरोध आहे. या महामार्गाला भारत मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करू शकतो. त्यामुळे त्या प्रकल्पाच्या चांगल्यासाठीच चीनने ही भूमिका घेतली असण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. आता यावर पाकिस्तान काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@