राम मंदिर अयोध्येतच कशाला? : फारुख अब्दुल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018
Total Views |



 
 
 
नवी दिल्ली : “भगवान श्रीराम हे सर्वव्यापी आहेत. विश्ववंदनीय आहेत. त्यांचे मंदिर हे फक्त अयोध्येतच बांधले जावे असा हटट् का?” असा सवाल जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. त्यांच्या या अशा वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला यांनी बोलत होते. सध्या देशभरात चालू असलेल्या राम मंदिराच्या मुद्द्याविषयी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. राम हे तर संपूर्ण जगाचे आहेत. मग त्यांचे मंदिर फक्त अयोध्येतच का हवे आहे? असा प्रश्न फारुख अब्दुल्ला यांनी विचारला. त्यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 

पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले संयुक्त जनता दलाचे नेते पवन वर्मा यांनी अब्दुल्ला यांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिले. “राम मंदिर हे अयोध्येत का बांधले जाऊ नये? अयोध्या हे प्रभू श्रीरामचंद्रांचे जन्मस्थान आहे. तेथे मंदिर व्हावे असे जर हिंदूंना वाटत असेल तर त्यात काय चुकीचे आहे?” असा सवाल पवन वर्मा यांनी केला. “अयोध्येत राम मंदिर बांधायचे की नाही हा मुद्दाच नाही आहे? राम मंदिर कसे बांधायचे? सर्वांच्या सहमतीने बांधायचे, जोरजबरदस्तीने बांधायचे की न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बांधायचे हा मुद्दा आहे.” असे पवन वर्मा यावेळी म्हणाले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@