अजब राजकारणाची गजब कथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018
Total Views |



 

हैद्राबाद : निवडणूकजवळ आल्या की सर्व नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मतदारांना खुश करण्यासाठी बऱ्याच युक्त्या लढवतात. नेते मंडळी आणि कार्यकर्ते दारोदारी जाऊन प्रचार करत आहेत. प्रत्येकजण आपआपल्या परीने मतदारांना खुश करायला भेटवस्तू देतात, कोणी रस्त्यावर येऊन कोणाला मदत करतात. पण, तेलंगणामधील टीआरएस पक्षाच्या एका उमेदवाराने हद्दच पार केली आहे. त्याने निवडणुकांचा प्रचार अभियान म्हणून चक्क लहान मुलांचे ढुंगण धुतले. हा व्हिडिओ सध्या मीडियावर खूप व्हायरल होतोय.

 
 
 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत टीआरएस पक्षाचा एक समर्थक कार्यकर्ता लहान मुलाचे ढुंगण धुत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, तो चिमुकला रडत असून हे नेते-कार्यकर्ते हसत हसत कॅमेऱ्याला पोझ देतानाही या व्हिडीओत दिसत आहे. तर या चिमुकल्याच्या आईने त्याला आपल्या दोन्ही हातांनी पकडल्याचे दिसून येते. तेलंगणातील पत्रकार सीएच सुशील राव यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@