शेअर बाजारात तेजी कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018
Total Views |

मुंबई : आयटी आणि सार्वजनिक बॅंकांच्या शेअरच्या खरेदीनंतर सेन्सेक्स निफ्टी १५९ अंशांनी मजबूत होऊन ३५ हजार ५१३च्या स्तरावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५७ अंशांनी वधारुन १० हजार ६८६च्या स्तरावर पोहोचला.

 

टीसीएस, रिलायन्स आणि इन्फोसिस आदी शेअर वधारले. केंद्र सरकारने सार्वजनिक बॅंकांना ४२ हजार कोटींचे भांडवली बळ देण्याचा मार्ग मोकळा झाल्याने बॅंकींग शेअरही वधारले. बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक, सिंडीकेट बॅंक, पीएनबी बॅंक, सेंट्रल बॅंक, ओरिएंटल बॅंक आदी शेअर दीड ते दोन टक्क्यांनी वधारत बंद झाले.

 

निफ्टीच्या मंचावर इन्फोसिस .८१ टक्क्यांनी वधारत ६३८.९०च्या स्तरावर बंद झाला. याशिवाय बीपीसीएल .४९ टक्के, टीसीएस .३९ टक्के, एचसीएल .२६ टक्क्यांनी वधारत बंद झाले. रिलायन्सचा शेअर .६६ टक्क्यांनी वधारत ११२८.२०च्या स्तरावर बंद झाला. अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धातील तणाव निवळण्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारातील निर्देशांक सावरले. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरणीमुळे तेल कंपन्यांच्या शेअरमध्ये किरकोळ घसरण झाली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@