केजरीवालांच्या दरबारात जीवंत काडतूसे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागचे शुल्ककाष्ठ संपण्याचे नाव घेत नसल्याची चिन्हे सध्या दिसत आहे. नुकतिच केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकण्याचा प्रकार घडला असताना मंगळवारी त्यांच्याच जनता दरबारातून एकाला जीवंत काडतूसांसह अटक केली आहे.

 

दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इमरान (वय ३९) असे त्याचे नाव आहे. तपासणीदरम्यान त्याच्या खिशात पिस्तुलगी गोळी सापडली.

 

त्याच्यासोबत १२ अन्य इमाम आणि मौलवी हेही होते. हे सर्व दिल्ली वक्फ बोर्डच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी, अशी शिफारस करण्यासाठी जनता दरबारात गेले होते. या प्रकरणामुळे अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@