नासाचे ‘इनसाइट’ यान मंगळावर उतरले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018
Total Views |



 
 
 
कॅलिफोर्निया : नासाचे ‘मार्स इनसाइट लेंडर’ हे यान मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले. मंगळ ग्रहावरील रहस्य उलगडण्यासाठी नासाने हे यान मंगळावर सोडले होते. ३०० दशलक्ष मैलांचा प्रवास पार पाडून मार्स इनसाइट लेंडर हे यान मंगळावर पोहोचले. मंगळावर पोहोचण्यासाठी सहा महिन्यांहून अधिक काळ या यानाला लागला. सोमवारी मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांनी हे यान मंगळावर उतरले.
 
 
 

मंगळ ग्रहाची अंतर्गत रचना पृथ्वीपेक्षा कशी आणि किती वेगळी आहे याचा शोध हे इनसाइट यान घेणार आहे. मार्स इनसाइट लेंडर हे यान मंगळावर पोहोचतानाचे थेट प्रक्षेपण नासाने केले. मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचताना इनसाइट यानाचा वेग हा १९,८०० किलोमीटर प्रतितास इतका होता. मंगळावर हे यान उतरताना त्याचा वेग ८ किलोमीटर प्रतितास इतका झाला. यानाची मंगळावर उतरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास ७ मिनिटे लागली.

 
 
 
 

यान यशस्विरित्या मंगळावर उतरले तेव्हा नासाच्या सर्व वैज्ञानिकांनी एकच जल्लोष केला. नासाचे प्रमुख जिम ब्राइडेंस्टाइन यांनी ट्विटरवरून यान उतरल्याची घोषणा केली. तसेच नासाच्या सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. कॅलिफोर्नियाच्या वंडनबर्ग एअरफोर्स स्टेशनवरून एटलस व्ही या रॉकेटद्वारे नासाने इनसाइट यानाचे प्रक्षेपण केले होते. यावर्षी ५ मे रोजी हे प्रक्षेपण करण्यात आले होते. याआधी २०१२ साली 'क्युरोसिटी' हे यान मंगळावर पाठवण्यात आले होते. त्या यानामुळे मंगळावर पाणी असल्याचा शोध लागला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@