तळोद्यात सायकल रॅली काढून शहिदांना अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018
Total Views |
 
 
तळोदा : 
 
26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना कृतीयुक्त अभिवादन करण्यासाठी तळोदा येथील छत्रपती ग्रुपच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली.
 
26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यातील शहीद झालेल्या पोलीस व जवानांना अभिवादन करण्यासाठी तळोदा येथील छत्रपती ग्रुपच्या वतीने उनपदेव ते तळोदापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
 
या सायकल रॅलीत 25 सायकलस्वार युवक सहभागी झाले होते. या सायकल रॅलीचे तिसरे वर्ष होते. सकाळच्या सुमारास शहादा तालुक्यातील उनपदेव या ऐतिहासिक पर्यटन स्थळापासून या सायकल रॅलीला सुरुवात झाली.
 
या रॅलीअंतर्गत शहादा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ तसेच बोरद ता.तळोदा येथेदेखील या रॅली अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. तळोदा येथे स्मारक चौकात संध्याकाळी या रॅलीचा समारोप करण्यात आला.
 
 
स्मारक चौकात मेणबत्त्या पेटवून शहिदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, नगराध्यक्ष अजय परदेशी, नगरसेवक हेमलाल मगरे, अनुप उदासी, केशव इंगळे, राजकपूर महाजन आदी उपस्थित होते.
 
 
सूत्रसंचालन हंसराज यांनी केले. आभार सुनील सूर्यवंशी यांनी मानले. या सायकल रॅलीत प्रकाश मराठे, सुधाकर मराठे, डॉ. लक्ष्मीकांत गिरनार, विक्रांत पाटील, मानसिंग गिरासे, हेमंत चौधरी, राकेश मराठे, लक्ष्मण पाटील, प्रमोद चौधरी, प्रदीप मराठे, शुभम जोहरी, पारस पाटील, गजेंद्र परदेशी, विक्की कोळी, रवी मराठे, अमित कलाल, जितेंद्र कलाल, यांसह युवकांनी सहभाग नोंदवला होता.
 
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी तळोदा येथील छत्रपती ग्रुप व भन्साळी प्लाझातील व्यापारी वर्गाने परिश्रम
घेतले.
@@AUTHORINFO_V1@@